Home बुलडाणा चोरीच्या मोटर सायकल सह सराईत चोरट्यास शिताफीने अटक ,

चोरीच्या मोटर सायकल सह सराईत चोरट्यास शिताफीने अटक ,

20
0

साखरखेर्डा पोलिसांची कामगिरी ,

अमीन शाह

सिंदखेडराजा , साखरखेर्डा पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या लव्हाळा फाटा येथुन दुचाकीने शेगाव येथून जालना येथे जाणाऱ्या एकाचा किरकोळ अपघात झाला होता त्या नंतर घटना स्थळावरून अज्ञात चोरट्याने सदर दुचाकी लंपास केली होती साखरखेर्डा पोलिसांनी याचा शिताफीने तपास करून दुचाकी सह चोरट्यास अटक करण्याची कामगिरी केली आहे ,

या संदर्भात मिळालेल्या माहिती नुसार दि , 29 , 6 , 2020 रोजी जालना जिल्ह्यातील उमरी येथील बाबासाहेब शेषराव गाडेकर हे शेगाव येथून जालना येथे चालले होते की उडनपूल जवळ त्यांची दुचाकी स्लिप होऊन ते जखमी झाले होते त्या नंतर जखमी अवस्थेत त्यांनी आपले रताळी येथील त्यांचे दाजी नारायण रावसाहेब भागडे यांना माहिती दिली त्यांनी जखमी बाबासाहेब गाडेकर यांना रुग्णालयात दाखल केले होते व त्यांची दुचाकी डीलक्स नंबर mh28 ak 7065 ही एका टिनशेड जवळ उभी केली होती नंतर दुसऱ्या दिवशी लव्हाळा फाटा येथे गेले असता दुचाकी दिसून आली नाही या प्रकरनि नारायण भागडे रा , रताळी यांच्या तक्रारी वरून साखर खेर्डा पोलिसांनी भा , द , वि , 379 नुसार गुन्हा दाखल केला होता ठाणेदार श्री , संग्राम पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली बिट जमादार अशोक काशीकर , पो , का , अनिल वाघ करीत होते या प्रकरणी पोलिसांनी बारकाईने तपास करून पिंपळगाव उंडा येथील सराईत चोर विजय दामोदर जाधव 27 यास शिताफीने अटक करून त्याच्या ताब्यातून चोरीस गेलेली मोटर सायकल हसगत केली आहे , या कामगिरी मूळे परिसरात साखरखेर्डा पोलिसांची प्रशनसा केली जात आहे ,

Unlimited Reseller Hosting