Home बुलडाणा मुरादपुर शिवारात सोयाबीन पिकावर चक्रीभुगा अळीचे आक्रमण , “शेतकरी पुन्हा संकटात”

मुरादपुर शिवारात सोयाबीन पिकावर चक्रीभुगा अळीचे आक्रमण , “शेतकरी पुन्हा संकटात”

32
0

सरनाईक यांच्यासह शास्त्रज्ञ,कृषी विभागाचे अधिकारी पाहणीसाठी बांधावर…

चिखली – प्रा. तनज़ीम हुसैन

बोगस बियाने उगवले नाही.कोरोना मुळे निर्माण झालेल्या परीस्थीतीने शेतकरी त्रस्त झाले आहेत.गेल्या काहि दिवसापासुन वातावरणातील बदलामुळे सोयाबीन पिकावर चक्रीभुंगा पडला असुन अळीचा वाढता प्रादुर्भाव दिसुन येत असल्याने मुरादपुर,मलगी शिवारातील सोयाबीन पिकाची शास्त्रज्ञ,कृषी विभागाचे अधिकारी यांच्याकडुन पाहणी करण्यात आली आहे. शेतकर्याना कीड व रोग नियंत्रणा संदर्भात माहिती देण्यात आली आहे.
सोयाबीन हे प्रमुख पिक असुन तालुक्यात यावर्षीही सर्वात जास्त पेरा सोयाबीन पिकाचा आहे.शेतकर्याना बोगस बियाण्यामुळे दुबार पेरणी करावी लागली होती तर आता सोयाबीनसह इतर पिकावर चक्रीभुंगा कीडीचे आक्रमण झाल्यामुळे शेतकरी अडचणीत सापडले आहेत. आधीच कोरोनामुळे शेतकरी संकटात आहेत.गतवर्षी पिकांना चांगला भाव मिळाला नाही.यावर्षी पेरले परंतु ते न उगवल्याने दुबार , तिबार पेरणी करावी लागली त्यातच भर म्हणुन चक्रीभुगा किडीमुळे सोयाबीन मध्ये घट होण्याचे चित्र आहे.हि किड खोडावर दोन समातंर खापा करुन अंडी घालते. यामधुन अळ्या बाहेर निघाल्यानंतर खोडातील गर खातात.त्यामुळे झाड सुकायला लागते व उत्पादनात घट येते. हा भुंगा एकाच ठीकाणी राहत नसल्याने वेळीच यावर उपाययोजना करणे गरजेचे झाले आहे. हरवी अळी जास्त प्रमाणात दिसुन येत चक्रीभुग्याचा प्रादुर्भाव मुरादपुर,मलगी शिवारातील शेतात दिसुन आला आहे.हिच परीस्थीती तालुक्यात असल्याचे चित्र आहे. याबाबत मुरादपुर येथील शेतकर्यानी रयत चे जिल्हाध्यक्ष तथा डॉ पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ कार्यकारी परीषद सदस्य विनायक सरनाईक यांना माहिती दिल्याने याची तातडीने दखल घेऊन दि. २४ जुलै रोजी के. व्हि. के चे शास्त्रज्ञ सी. पी. जायभाये , कृषी मंडळ अधिकारी ए. ए. आंभोरे , कृषी सहाय्यक यांच्यासह अधिकार्यानी शेताची पाहणी केली आहे. सद्यास्थीती सोयाबीन पिक जोमात आहे.सोयाबीन हे फुले लागण्याच्या अवस्थेत आहे. यातच अळीचा प्रादुर्भाव वाढत असल्याचे दिसुन येत असल्याने याबाबत सोयाबीनवर प्रादुर्भाव असल्याचे दिसुन आल्यास ट्रायझोफाँस , प्रोपँनोफाँस, क्लोऱ्यांन्ट्रीनोपोल , ल्यामडा सायलोथ्रीन , इमामेक्तीन बेंझोयेट कीटकनाशकाची फवारणी करण्यात यावी असे आवहान यावेळी शास्त्रज्ञ व कृषी विभागाच्या अधिकार्याकडुन करण्यात आले आहे. दरम्यान देऊळगाव राजा तालुक्यातील चिंचखेड , मंडपगाव येथील शेतकर्यानी आद्रक लागवड केली आहे. त्यावर रोग पडल्याने आद्रकीला सडवा लागल्याने पिकाचे नुकसान होत असल्याने याची पाहणी सुद्धा करण्यात आली आहे. यावर नियंत्रणासाठी हि शास्त्रज्ञ,तालुका कृषी अधिकारी यांनी शेतकर्याना माहिती देऊन उपाययोजना करणे संदर्भात मार्गदर्शन करण्यात आले आहे.
यावेळी डॉ. पंदेकृवि चे सदस्य विनायक सरनाईक,के व्ही के चे शास्त्रज्ञ जायभाये , देऊळगाव राजा तालुका कृषी अधिकारी म्हसाळकर,मंडळ कृषी अधिकारी ए. ए. आंभोरे , पत्रकार समाधान गाडेकर , बाळु गाडेकर , विष्णु प्रल्हाद गाडेकर , सुखदेव गाडेकर , समाधान वायाळ , सरपंच मार्तड वायाल , शेख जुल्फेगार , रामेश्वर वायाळ , शिवाजी वायाळ , यांच्यासह मुरादपुर , चिंचखेड येथील शेतकरी उपस्थीत होते.

Unlimited Reseller Hosting