Home महत्वाची बातमी रुग्ण वाढ लक्षात घेता यवतमाळ शहरात जनता कर्फ्यु जाहीर करा – मनसे...

रुग्ण वाढ लक्षात घेता यवतमाळ शहरात जनता कर्फ्यु जाहीर करा – मनसे जिल्हाधिकाऱ्यांना मनसेचे निवेदन

699

पोलीसवाला ऑनलाइन मिडिया

यवतमाळ – शहरामध्ये कोरोना रूग्णांची दिवसेंदिवस वाढती संख्या लक्षात घेता जिल्हा प्रशासनाच्या वतीने काही कडक पाऊले उचलने गरजेचे आहेत. दिलेल्या ४ तासाच्या मुदतीत बाजारामध्ये मोठ्याा प्रमाणात यवतमाळातील नागरीकांकडून गर्दी केल्या जात असल्याचे चित्र पाहावयास मिळत आहे. सोबतच शहरातील काही व्यापारी प्रशासनाद्वारे निर्देशीत नियमांची पायमल्ली करत असल्याचे चित्र पाहावयास मिळत आहे. तसेच गरज नसतांना घराबाहेर पडणाऱ्या युवकांची व नागरीकांची रोजच झुंबड दिसत आहे. शहरात सर्वत्र सोशल डिस्टंसिंग (सामाजिक अंतर) चे तिन तेरा वाजले असून प्रशासनाच्या वतीने यवतमाळ शहरात कोरोनाचा वाढता प्रभाव रोखण्यासाठी कमीत कमी ८ दिवसाचा जनताकर्फ्यु जाहीर करावा. अशी मागणी मनसेच्या वतीने जिल्हाध्यक्ष देवा शिवरामवार , अनिल हमदापुरे यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनात केली.
याप्रसंगी बोलतांना मनसे तर्फे जिल्ह्याा अंतर्गत येजा करणाऱ्या सर्व नागरीकांना काॅरंटाईन (विलगीणीकरण) करण्यात यावे. जिल्ह्याात राज्यातील इतर ठिाकाणाहून येणाऱ्या तसेच परदेशातुन येणाऱ्या नागरीकांना 14 दिवस सक्तीचे काॅरंटाईन (विलगीणीकरण) करावे, इतर राज्यात जिल्ह्याातुन लाॅकडाऊन काळात परत गेलेले मजुर कामधंद्यासाठी पुन्हा जिल्ह्याात परत येत असून त्यांची माहिती लपविल्या जात आहे. संबधित पोलीस प्रशासनाला सुप्रीम कोर्टाच्या निर्देषानुसार या नागरीकांची नोंदणी करून यांची वैद्यकीय तपासणी करून त्यांना काॅरंटाईन (विलगीणीकरण) करावे. जे नागरिक मास्क चा वापर करीत नाही त्यांना जागेवर दंड करून त्यांच्या विरोधात कडक कार्यवाही करावी. अश्या स्वरूपाच्या मागण्या मनसेच्या वतीने करण्यात आल्या.यावेळी चर्चे दरम्यान मनसेने या सुचनांचा गांभिर्याने विचार व्हावा ही अपेक्षा व्यक्त करत प्रशासनाने कठोर पावले न उचलल्यास वेळ हातातून निघून जाईल असा इशारा ही देण्यात आला. याप्रसंगी प्रामुख्याने जिल्हाध्यक्ष देवा शिवरामवार,अनिल हमदापुरे ,संजय देठे, अमित बदनोरे ,विकास पवार यासह इतर पदाधिकारी उपस्थित होते.