Home विदर्भ आज 11 रुग्ण कोरोनाबाधित , एकाची कोरोनावर मात…!

आज 11 रुग्ण कोरोनाबाधित , एकाची कोरोनावर मात…!

32
0

सौ.पदमाताई प्रभाकर मुंजेवार

ऍक्टिव्ह पॉझिटिव्ह 47

वर्धा , दि. 22. :- जिल्ह्यात आज 8 कोरोना रुग्णांची भर पडली असून बाधित रुग्णांमध्ये आष्टी, आर्वी आणि वर्धा तालुक्यातील रुग्णांचा समावेश आहे. जिल्ह्यात एकूण कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 94 झाली असून एकूण ऍक्टिव्ह रुग्ण 47 आहेत. आज एका रुग्णाने कोरोनावर मात केली असून त्यांना घरी सोडण्यात आले आहे.
आज आढळून आलेल्या कोरोना बाधित रुग्णांमध्ये आष्टी तालुक्यातील धाडी येथील 5 रुग्ण, वर्धा शहर- 2, आंजी मोठी -2, आर्वी -1 जळगाव – 1 या रुग्णांचा कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आला आहे.
आजच्या कोरोना बाधित रुग्णासहित जिल्ह्यात एकूण रुगणांची संख्या 94 झाली असून 45 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत तसेच ऍक्टिव्ह पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या 47 झाली आहे.
प्रयोगशालेय तपासण्या
जिल्ह्यात आतापर्यंत 6 हजार 876 कोरोना चाचणी करण्यात आली असून त्यापैकी 6 हजार 723 अहवाल प्राप्त झाले आहेत. यात 6 हजार 607 निगेटिव्ह तर 94 पॉझिटिव्ह आहेत, तसेच 153 अहवाल प्रलंबित आहेत. आज 156 स्त्राव नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आले असून आयसोलेशन मध्ये 203 व्यक्ती आहेत.
गृह विलगिकरण 65 हजार 607 व्यक्तींना आजपर्यंत गृह विलगिकरण करण्यात आले आहे. त्यापैकी 58 हजार 795 व्यक्तींचा गृहवीलगिकरण कालावधी संपला असून 6812 व्यक्ती आज गृहवीलगिकरणात आहेत.तसेच 236 व्यक्ती संस्थात्मक विलगिकरणात आहेत.

Unlimited Reseller Hosting