Home विदर्भ फक्त एक समोसा अन गेला जीव???

फक्त एक समोसा अन गेला जीव???

32
0

अमीन शाह

आठवीमध्ये शिकणाऱ्या ११ वर्षाच्या मुलानं चक्क समोसा न दिल्याच्या रागातून आत्महत्या केली आहे. नागपूरातील कोटल रोडवरील गंगानगरमध्ये ही धक्कादायक घटना घडली आहे. १३ वर्षाच्या मोठ्या भावाने हातातील समोसा हिसाकावून घेतल्यामुळे रागाच्या भरात ११ वर्षीय मुलानं आत्महत्या केली.
मृत्यू पावलेल्या मुलानं कुटुंबाला न सांगता घरातून दहा रुपये घेतले अन् समोसा खरेदीसाठी गेला. त्यावेळी ही बाबा त्याच्या मोठ्या भावाने पाहिली अन् त्याचवेळी त्यानं रडण्यास आणि ओरडण्यास सुरूवात केली. अतिशय गरिब कुटुंबातील ही भावडं असून त्यांचे वडील भाजीपाला विकून कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात.
मोठ्या भावानं लहान भावाच्या हातून घेऊन समोसा खाल्ला होता. त्यामुळे त्या ११ वर्षीय मुलीनं आईकडे तक्रार केली. समोसा हिसकावून घेतल्यामुळे अस्वस्थ होऊन ११ वर्षीय मुलानं रडारड सुरू केली. त्यानंतर आईने त्याला आणखी एक समोसा आणण्यासाठी सांगितलं. मुलानं आणखी एक समोसा आणण्याएवजी दुसऱ्या खोलीत जाऊन गळफास घेत आत्महत्या केली. बाजूच्या खोलीत शिवणकाम करणाऱ्या आईला आणि खेळणाऱ्या मोठा भावाला याची थोडीशीही कल्पना नव्हती.
थोड्यावेळानंतर आई आपल्या लहान मुलाला पाहण्यासाठी बाहेर आली मात्र, तो कुठेच दिसला नाही. त्यातच दुसरी रुम आतून लावलेली दिसली. शेजाऱ्यांचा ही गोष्ट समजल्यानंतर त्यांनी घराचे दार तोडले. मात्र, तोपर्यंत खूप उशीर झाला होता. ११ वर्षीय मुलाने आपलं जीवन संपवलं होतं. ही घटना समजताच पोलिसांनी तात्काळ घटनास्थळावर धाव घेतली. नागपूर पोलिस या घटनेचा आधिक तपास करत आहेत.

Unlimited Reseller Hosting