Home नांदेड नांदेड जिल्ह्यात लवकरच कोविड १९ – जलद तपासणीसाठी ५ हजार अँटिजेन किट्स...

नांदेड जिल्ह्यात लवकरच कोविड १९ – जलद तपासणीसाठी ५ हजार अँटिजेन किट्स होणार उपलब्ध –  जिल्हादंडाधिकारी डाॕ.इटनकर

101

नांदेड, दि.२० ( राजेश एन भांगे ) – जिल्ह्यातील कोरोनाची साखळी खंडित व्हावी यासाठी जिल्हा प्रशासनातर्फे व्यापक प्रयत्न केले जात आहेत. कोरोना-19 आजाराचे लवकरात लवकर निदान व्हावे यासाठी शासनाने पूर्वी 500 अँटिजेन टेस्ट किट्स उपलब्ध करुन दिल्या होत्या. या किट्समुळे सुमारे 1 तासात रुग्णांची टेस्ट हाती लागत असल्याने कोरोना व्यवस्थापनाच्या दृष्टिने ही एक मोठी उपलब्धी तपासणीच्या दृष्टिने आहे. या तपासणी किट्सचे वैशिष्ट्ये लक्षात घेता सुमारे 5 हजार ॲटिजेन टेस्ट किट्स उपलब्ध करुन देण्याचा निर्णय शासनाने घेतला असून हे किट्स येत्या तीन ते चार दिवसात जिल्ह्याला उपलब्ध होत असल्याची माहिती जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी दिली.