Home उत्तर महाराष्ट्र किती दिवस झाकणार भावांनो?      पत्रकारिता क्षेत्रात निष्टावंतांचे मरण…!

किती दिवस झाकणार भावांनो?      पत्रकारिता क्षेत्रात निष्टावंतांचे मरण…!

249

सामान्य ग्रामीण / शहरी पत्रकारांपुढं मरणाचा काळ…!!

राम खुर्दळ

कोरोनाच्या साथीचे थैमान सर्वत्र सुरू आहे,सामान्य माणूस पुरता उध्वस्त झाला आहे,रोजच्या शेतकरी आत्महत्यांच्या बातम्यांसोबत आता युवकांच्या पालकांच्या आत्महत्यांच्या बातम्यांची रेलचेल सुरू झाली आहे,कोरोनात मरण स्वस्त झालं तसं सामान्य माणसातला जिवंतपणा ही संपला आहे.तब्बल ४ महिन्यांपासून लोकडाऊन व संसर्गाने सगळा आर्थिक गाडा मोडून पडला आहे.कसेबसे जगणारे कर्ते जीव आता मरण बरं पण घरातील अडचणी सोडवण्यासाठी सैरवैर झाल्याचे मी रोज बघतो,कारण मीही तितकाच वेडापिसा झालोय,पेशाच तसा आम्ही पत्करलाय,आमच्या पेशाला वेश्या म्हणतात,पण तसे म्हणणं योग्य नाही,अहो मी ३२ वर्षांपासून बघतोय ही स्थितंतरे,चढउतार,ती आता अधिक गडद व अवघड बनली आहे,काळच तसा आलाय,मी विषय घेणार आहे तो पत्रकारितेत बिनपगारी राबणाऱ्या,बातमीसाठी अहोरात्र जगणाऱ्या,माध्यमाच्या डोईजड जबाबदाऱ्या पेलणाऱ्या,प्रसंगी दिलेल्या बातमीबद्दल चांगले क्वचित पण वाईट परिणामांना सामोरे जाणाऱ्या,प्रसंगी सडेतोड लेखनामुळे गावगुंड व माफियांच्या रडारवर असलेल्या,भ्रष्टाचार व्यसन,अवैध उद्योगाबद्दलच्या वृतांबद्दल गुंडाकडून होणाऱ्या मारहानी,बदनामी,खोट्या केसेस,गावातील वस्तीतील व्यवसायातील आडचनी,छळ,अश्या प्रकाराला बळी पडणाऱ्या एका एका बातमीसाठी दिवसभर घरची कामे सोडून बातमीसाठी स्वखर्चातुन उपाशीपोटी राबणारया अन त्या बातमीच्या बदल्यात अर्ध्या कोलमला २० रुपये मानधन असलेल्या वेड्यापिश्या धडपड्या ग्रामीण व शहरी बिटवर दिमाखात स्वतःला पत्रकार असल्याची मिरवणूक काढणाऱ्या,आजच्या काळात कुठलेही आर्थिक व शारिरीक संरक्षण नसलेल्या निष्ठता असलेल्या पत्रकारांची व्यथा मी मांडीत आहे.
( कृपया पत्रकारिता आपल्या सोयीसाठी,व्यवसायासाठी वापरणाऱ्या साहेबी नेत्या अधिकाऱ्यांच्या मागेपुढं असणाऱ्या पत्रकारांसाठी हे लेखन अजिबात नाही अश्याना मी तरी पत्रकार मानत नाही,कारण पत्रकारिता ही सामाजिक आरसा असतो हेच माझे शिक्षण आहे. हे मी स्पष्ट करीत आहे )

कशी असते ग्रामीण शहरी बिटवरील बातमीदारांची दैनंदिनी?

नेमून दिलेल्या बिटवर रात्रंदिवस लक्ष ठेवायचे,स्वतःची कामे बाजूला ठेवून प्रसंगी राजकीय,सामाजिक,गुन्हेगारी,अपघात,विकास,लोकांचे प्रश्न,शेती अश्या सर्वच विषयाचे वृत्तांकन फोटोसह मेल करायची त्यासाठी प्रसंगी फिल्डवर जायचे,मुलाखती घ्यायच्या फोटो काढायचे,कोट घ्यायचे,फोन करायचे,संदर्भ मिळायचे असे सगळे उद्योग त्या बातमीसाठी करायचे ती लिहून एडिट करून मेल करायची,सगळा वेळ खर्च स्वतः करायचा,विशेष घटना कार्यालयीन सूचना याचे काटेकोर पालन करायचे,बदल्यात एक ओळखपत्र जे केवळ नावाला व्हीआयपी कार्यक्रमास माहिती कार्यालयाचा पास असतो, महिन्याचे मानधन १५० पासून हजारापर्यंत स्वतःचा महिनाभर वृत्तांकन खर्च ३००० रुपये,लोक म्हणशील का करतो हे उदद्योग?अरे बाबांनो तुमच्याच सुखासाठी जागृतीसाठी हे व्रतस्थ कार्य करतोय,असे त्याचे उत्तर,मात्र केवळ सेवावृत्ती,व्यासंग म्हणून समाजजागृती साठी आजपर्यंत असंख्य ग्रामीण शहरी वार्ताहर ही कामे करतात ( काही या क्षेत्रातील वतनदार सोडून )

बरं कोण असतो हा घटक?

अहो शिकलेला,कुठल्याही राजकीय पक्षाशी समंदीत नसलेला,सर्वाभिमुख दृष्टी असलेला बहुतांशी सामान्य कुटुंबातील बरेचसे अल्पभूधारक,भूमिहीन,किंवा बरेच बेरोजगार ही ग्रामीण/शहरी बिटवरील पत्रकारिता करतात,(साध्या या क्षेत्रात काही नोकरी करणारे,काही बडे व्यावसायिक ही आहेत माझा लेख त्यांच्यासाठी नाही,त्यानी वाचू ही नये )

या घटकांची उत्पनाचे साधन काय?

कुठंतरी पानटपरी,भाजीविक्रेता,शेतकरी मजूर,बेरोजगार ही यात असतात,छोटा व्यवसाय करून कसेबसे अडचणीत ही।मंडळी आयुष्य जगतात,पिंड इमानदारीचा असल्याने सामाजिक जागृती मुद्यावर हे पत्रकारिता करतात,त्यांच्या वैयक्तिक कामाईतील पैसे यातून नेट , फोन , इंधन , प्रवास , फोटो , मोबाईल,कम्प्युटर स्वतःचे असते,बदल्यात मिळणारे मानधन खूपच अल्प असते,जाहिराती आणा त्यावर 10 टक्के जीएसटी अन केवळ 10 टक्के कमिशन मिळते ते ही तुटपुंजेच,मला कळते हा बदलत्या काळात व्यवसाय आहे,मात्र त्याची मूल्ये आपल्या चारित्र्यावर कर्मावर आहेत …
हे गुपित स्पष्टपणे का लिहितो?अस अनेकजण म्हणतील गेल्या ३० वर्षे उचचशिक्षित ग्रामीण पत्रकार म्हणून कार्यरत आहे,कित्येक मारहानी,दमदाटया, अवमान , अपमान, प्रसंगी केसेस,अडचणी, उपेक्षा,बहिष्कार,बदनाम्या,या वाटेत भोगल्या माझे कित्येक भाऊ त्याच वाटेत उपेक्षित आयुष्य जगत आहेत,मात्र गप्प बसने आपला धर्म नाही, मी स्वतः कलावंत आहे,पत्रकारिता,पथनाट्य,स्क्रिप्ट रायटिंग संहिता लेखन,भित्तीपत्रके,पपेट,काव्य,
दुर्गव्याख्याता,नाट्य अश्या कित्येक माध्यमात मी कार्यरत आहे. हे शिकता शिकता मी देशातील अनेक सामाजिक क्षेत्रातील व्यक्ती संस्थांच्या सहवासात राहिलो तेथील विवेचन मेहनत मी शिकलो,डॉ बाबाआमटे यांचे आनंदवन,महर्षी विनोबाजी भावे यांचे भूदान चळवळीचे गीता मंदिर , सेवाग्राम , साबरमती , राळेगणसिद्धी, हिवरेबाजार,पाटोदा,प्रयोगशील संस्था केंद्रे व्यक्ती अशा कित्येक विभूतींचा , गावांचा मला सहवास लाभला,ते माझी प्रेरणा आहेत,पुस्तके,अभ्यासू व्यक्ती ही आमचे संस्कार आहेत,पत्रकारिता हे व्रत आहे. मी पत्रकारांचे संघटनात्मक चळवळीत ३० वर्षे आहे. सतत पत्रकारांचे हक्कासाठी आम्ही लढतो,गटात विभागलेले हे घटक एकमेकांना साथ ही देत नाही,मोठ्या आसामी समाजाला नेत्यांना दिसतात, गरीब पत्रकार नेहमीच दुर्लक्षित आहे, पत्रकारांचे समाज व सरकार यांनी स्थर समजून घेऊन प्राधान्याने ग्रामिण/शहरी बिट पत्रकारांना त्यांचे हक्क द्यावे,मात्र त्यांना त्याची गरज वाटत नाही अहो रोजगार हमी पेक्षा कमी मानधन असलेला हा घटक जिमाका व शासनाला समाजाला अजून समजत नाही हे दुर्दैवच.

सध्या कोरिनाच्या काय आहे सामान्य पत्रकारांची स्थिती – सामान्य पत्रकार जे ग्रामीण शहरी बिटवर असतात त्त्यापैकी कित्येकांचे सध्याच्या काळात छोटे रोजगार बंद आहेत,मोडून पडले आहे,भांडवल नाही,घराबाहेर जाता येत नाही,घराचा किराणा,घरभाडे,लाईटबिले, घरपट्ट्या , शिक्षणाचे खर्च,मुलांचे ऑनलाइन नेटखर्च , भागवणे मोठी जीवघेणा खेळ होऊन बसला आहे,मरणाचे दिवस आले आहेत,कित्येकाना दैनिकातून काढल्यावर त्यांना किती यातना असतात त्या समजल्या मात्र आम्ही सतत आव उठवीत आहोत एक व्हा भेद करू नका प्रसंगाला साथ द्या मात्र सगळे गटात तटात,
सध्या माध्यमे ही रसातळाला जात आहेत , आर्थिक दिवाळखोरी आली आहे , सामान्य पत्रकार माध्यमांचा सुकाळ होता तेव्हाही दुर्लक्षित उपेक्षीत होता आजही पुरता उध्वस्त झाला आहे,चिंता आहे घर कस चालवायचं?घरातले आजार पाजार खर्च कसे भागवायचे?पुढं कसं जगायचं?याची….

आपला:-
श्री. राम खुर्दळ (पत्रकार)
राज्यउपाध्यक्ष-पत्रकार संरक्षण समिती , महाराष्ट्र
मो:-9423055801