Home विदर्भ आलेगाव येथे कोरोनाचा रुग्ण निघाल्याने प्रशासन अलर्ट

आलेगाव येथे कोरोनाचा रुग्ण निघाल्याने प्रशासन अलर्ट

159

तहसीलदार दीपक बजाड व तालुका स्वास्थ अधिकारी विजय राठोड यांनी घेतली आढावा बैठक

अकोला – पातुर तालुक्यातील आलेगाव येथे कोरोना रुग्ण निघाल्या ने चांन्नी चे ठाणेदार गणेश वनारे तलाठी, ग्रामपंचायत प्रशासन यांनी एरिया सील केला.या पूर्वी सुद्धा अलेगावात कोरोनाचा रुग्ण निघाल्याची माहिती आहे परंतु तो रुग्ण 2 ते 3 महिने पूर्वी प्रस्तुती साठी अकोला येथे राहत होता अशी माहिती मिळाली

परंतु शनिवारी आलेगाव येथे कोरोनाचा रुग्ण निघाल्याने तहसील प्रशासनाने व स्वास्थ विभागाने दुसऱ्या दिवशी रविवारला आलेगाव प्राथमिक आरोग्य केंद्रात आढावा बैठ घेऊन सोमवार ला रेपीड टेस्ट घेण्याची प्रकिर्येला सुरुवात करणार आहे. हे रेपीड टेस्ट आलेगाव येथील जिल्हा परिषद मुलांची शाळा मस्तान चौक येथे घेण्यात येणार आहे. तरी तहसील प्रशासन व स्वास्थ विभाग यांनी नागरिकांना पुढे येऊन स्वतः ची तपासणी करून घेण्याचे आव्हान केले आहे . या आढावा बैठकीत तहसीलदार दीपक बजाड,पातूर तालुका स्वास्थ अधिकारी विजय जाधव, आलेगाव प्राथमिक आरोग्य केंद्राची डॉक्टर ,डॉ,स्नेहा चोव्हान, मंडल अधिकारी,विजय राठोड, तलाठी,इंगळे,कोतवाल, बोचरे,राईटर, सै, शब्बीर,सारपंज,बाळु कंटाले,उप सरपंजच मुलगा ,शेख ,साहिल व आलेगाव ग्रामपंचायतचे सदस्य उपस्थित होते.