Home महत्वाची बातमी विवाहित महिलेवर प्रियकराचा प्राणघातक हल्ला….!

विवाहित महिलेवर प्रियकराचा प्राणघातक हल्ला….!

120

निवस्त्र करून बोरगाव ते घुई रोड वर दगडाने ठेचून हत्या करण्याचा प्रयत्न….!!

नेर प्रतिनिधि

यवतमाळ / नेर – तालुक्यातील शेवटच्या टोकावर असलेल्या बोरगाव लिंगा येथे एका विवाहित महिलेवर प्राणघातक हल्ला करून तिला दगडांनी ठेचून मारण्याचा प्रयत्न करण्यात आला. परंतु स्थानिक नागरिकांनी तिला शासकीय रुग्णालय यवतमाळ येथे दाखल केले. त्यामुळे संबंधित विवाहितेचा जीव वाचला असून विशाल रामटेके या आरोपीविरुद्ध लाडखेड पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
सदर वृत्त असे की सदर विवाहित महिला चे लग्न हे तालुक्यातील सारंगपूर येथे एका कुटुंबामध्ये करण्यात आले होते. परंतु कुटुंबा मधली हलाखीची परिस्थिती बघता सदर विवाहिता ही यवतमाळ येथे एका जिनिंग-प्रेसिंग मध्ये काम करण्यासाठी जात होती. ती त्यावेळी कधी दिवस तर कधी रात्रीच्या वेळी चारचाकी क्रूजर गाडी ने कामानिमित्त जात असताना तिचे चालक विशाल रामटेके यांचे प्रेम संबंध जुळले . या विवाहित महिलेला एक मुलगी व एक मुलगा असल्यामुळे सदर विवाहितेने विशाल रामटेके यांना याबाबत अनेकदा समज देऊन सुद्धा त्याचे सारंगपूर येथे येणे-जाणे करू नये व माझ्याशी संबंध तोडावे अशी विनवणी केली. परंतु हा आरोपी विशाल हा या विनवणी ला न जुमानता सारंगपूर ला येणे-जाणे सुरू होते.

ही बाब लक्षात घेता विवाहितेच्या पतीने याला विरोध करून सदर विवाहितेला घरातून बाहेर काढले व त्या संधीचा फायदा घेऊन विशाल रामटेके या युवकाने त्या विवाहित महिलेला बोरगाव येथील आपल्या घरी घेऊन गेला. त्या घटनेपासून तीन ते चार महिन्यापर्यंत संबंधित विवाहित महिला व त्यांचा प्रियकर विशाल रामटेके यांचा संबंध संसारिक जीवन सुरळीत सुरू होते. परंतु अचानकपणे प्रियकर विशाल रामटेके यांनी त्या विवाहित महिलेवर पाप लावणे सुरू केले. तूजा दुसर्यासोबत आणखी काही संबंध असल्यामुळे माझे घर सोडून जा अन्यथा मी तुला मारून टाकीन अशी धमकी देत होता. संबंधित विवाहित महिलेने विशाल रामटेके यांना समजण्याचा भरपूर प्रयत्न केला परंतु त्यांनी समजण्याचा विचार न करता दिनांक 2 जुलै 2020 रोजी सायंकाळी सहाच्या दरम्यान बोरगाव ते घुई रोडवर संबंधित महिलेला निर्वस्त्र करून त्यांच्या छातीवर दगडाने वार करून मारून टाकण्याचा प्रयत्न करण्यात आला. परंतु त्या वेळी स्थानिक नागरिकांनी येऊन संबंधित विवाहित महिलेला बोरगाव येथील आरोग्य केंद्रामध्ये दाखल केले. त्यानंतर तिथून त्या महिलेला यवतमाळ येथील शासकीय रुग्णालयात पुढील उपचारासाठी दाखल करण्यात आले. त्यांच्यावर तब्बल दहा ते बारा दिवस उपचार सुरू होते परंतु त्यावेळी त्या मुलीचे कोणतीही नातेवाईक भेटण्यासाठी सुद्धा आले नाही अशा परिस्थितीमध्ये त्या महिलेला स्थानिक यवतमाळ शासकीय रुग्णालयातील सामाजिक कार्यकर्ते व रुग्णालयातील कर्मचाऱ्यांनी योग्य ते उपचार करून त्यांची प्रकृती ठीक केली. संबंधित महिला ही दोन दिवसापूर्वी मला मदत द्यावी म्हणून सारंगपूर येथील आपल्या पतीच्या घरी गेली असता त्या महिलेचे नेर तालुक्यातील काही सामाजिक कार्यकर्त्यांनी सात्वन केले व तेथून ती महिला लाडखेड पोलिस स्टेशन येथे संबंधित आरोपी विशाल रामटेके यांच्या बाबत संपूर्ण घडलेली घटना सांगून तक्रार दाखल केली. संबंधित विवाहितेच्या तक्रारीवरून लालखेड पोलीस स्टेशन मध्ये आरोपी विशाल बळीराम रामटेके वय 26 यांच्यावर 506,324, 354 यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक कारेगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे. तरी या प्रकरणी उच्चस्तरीय तपासणी व्हावी याची मागणी तालुक्यातील नागरिक करीत आहे.