Home विदर्भ कोरोना रुग्णांवर अंत्यसंस्कार करणाऱ्या कोरोना योध्दांसाठी मनसे तर्फे पीपीई किट वाटप….

कोरोना रुग्णांवर अंत्यसंस्कार करणाऱ्या कोरोना योध्दांसाठी मनसे तर्फे पीपीई किट वाटप….

371

नगर पालिका मुख्याधिकारी यांना किट सुपूर्द….

यवतमाळ – जिल्ह्यात कोरोना रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता मनसेने सामाजिक जाणीवेतून आरोग्य विभागाला १००० पीपीई किट चे वाटप केले.

त्याच अनुषंगाने नुकतेच यवतमाळ येथील मृत कोरोना रुग्णांवर अंत्यसंस्कार करणाऱ्या नगर पालिकेच्या कर्मचाऱ्यांसाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेना मदतीला धावली असून आपली सामाजिक बांधिलकी जोपासत मानवतेच्या दृष्टिकोनातुन या कर्मचार्यांनच्या संरक्षणासाठी पीपीई किट नगर पालिकेचे नवनियुक्त मुख्याधिकारी सुनील बल्लाळ यांच्या कडे मनसेचे जिल्हाध्यक्ष देवा शिवरामवार , अनिल हमदापुरे यांच्या हस्ते नगर पालिकेकडे सुपुर्द करण्यात आल्या.
मनसेच्या वतीने नवनियुक्त मुख्याधिकाऱ्यांचे यवतमाळ नगरीत स्वागत करण्यात आले.आणि यवतमाळकरा समोरील रोज भेडसावणाऱ्या समस्या आणि प्रश्न याची तोंडओळख त्यांना प्राथमिक स्वरूपात करून देण्यात आली.या प्रसंगी अनिल हमदापुरे यांनी मनसेच्या या उपक्रमाची माहिती मुख्याधिकारी यांना दिली. आणि भविष्यात जनतेला भेडसावणाऱ्या कोणत्याही प्रश्नावर मनसे सदैव सहकार्य आणि सकारात्मकपणे भूमिकेत राहील याची ग्वाही दिली.
या प्रसंगी प्रामुख्याने शिवसेना जिल्हाप्रमुख परागभाऊ पिंगळे व इतर नगरसेवक तसेच मनसेचे संजय अंबलकर, अभिजित ढोमणे, विकास पवार, फारुख तमन्ना व इतर मनसेचे कार्यकते पदाधिकारी उपस्थित होते.या प्रसंगी उपस्थित नगरसेवकांनी मनसेच्या या उपक्रमाचे तोंडभरून कौतुक केले आणि शहरातील त्यांच्या वॉर्डात प्रतिबांधित क्षेत्रासाठी पण पीपीई किट मनसेने उपलब्ध करून द्याव्या अशी विनंती केली. यावर मनसेचे जिल्हाध्यक्ष देवा शिवरामवार यांनी लवकरच या बाबत मनसे पीपीई किट उपलब्ध करून देईल अशी ग्वाही या प्रसंगी दिली.