Home महत्वाची बातमी पोलिस उपनिरीक्षकाची दादागिरी , “चेक पोस्ट वरती होत आहे सर्व साधारण लोकांना...

पोलिस उपनिरीक्षकाची दादागिरी , “चेक पोस्ट वरती होत आहे सर्व साधारण लोकांना त्रास”

250

वर्धा / तळेगाव शा.पंत – दि.18/7/2020
तळेगाव पोलीस स्टेशनच्या हद्दीत असणारी चेक पोस्ट ही नेहमीच वादाच्या भोवर्‍यात आहे तळेगाव पोलीस स्टेशनच्या हद्दीत खडका हे गाव आहे ते अमरावती जिल्ह्याचे सीमेवर आहे पण पोलीस चेक पोस्ट तेथून अर्धा किलोमीटर भिष्णूर या गावाच्या जवळ असल्यामुळे अमरावती वरून येणारे काही कर्मचारी जे ते उपस्थित असलेल्या पोलीस उपनिरीक्षकाच्या मनमर्जी चे असल्यामुळे त्यांना खडक्या यावरून येण्याचे सांगण्यात येते तेथे उपस्थित पोलीस उपनिरीक्षक रवी मनोहर हे खूपच कडक अधिकारी म्हणून त्यांची ख्याती आहे. पण साहेब माणुसकीही विसरल्याचे दिसते.बिमारी ही कधीही सांगून येत नाही. तळेगाव पासून अमरावती पन्नास किलोमीटरवर आहे तर मोझरी येथील दवाखाना 18 किलोमीटरवर आहे त्यामुळे तळेगाव येथील नागरिक हे दवाखान्या करिता ये-जा करीत असतात पण कधीकधी पेशंटला ताबडतोब न्यावे लागत असल्यामुळे त्यांनी जर पास काढण्याकरता वेळ घालवला तर कदाचित त्या पेशंटचा जीव सुद्धा जाऊ शकतो कारण आर्वी येथे भरपूर दवाखाने आहेत पण पेशंट नेण्याकरिता बराच वेळ लागतो त्याचे मुख्य कारण रोड त्यामुळे नाईलाजाने पेशंटला अमरावती किंवा मोझरीला न्यावे लागते. ज्यावेळी ते पेशंट व त्यांचे नातेवाईक जवळ चेक पोस्ट वरती येतात तेव्हा जसा की त्यांनी खूप मोठा गुन्हा केला अशी त्यांच्यासोबत वागणूक दिली जाते अशीच एक घटना काही दिवस आधी घडली होती व चेक पोस्ट वरती कार्यरत पोलिस उपनिरीक्षक रवी मनोहर होते. घटना अशी की कारंजा येथील एका 35 वर्षे इसमाने गळफास लावून आत्महत्या केली होती. त्यामुळे त्या इसमाची बहीण व जावई हे अकोला येथून त्यांचे पार्थिवाचे दर्शन घेण्याकरिता आले होते. अकोला येथून येताना त्यांना तीन ते चार चेक पोस्ट लागल्या होत्या आणि त्यांना पास काढण्याकरता वेळ मिळाला नव्हता तेव्हा ते प्रत्येक चेक पोस्ट वरती आप बीती सांगत होते व त्यांना तेथील अधिकारी व कर्मचारी सोडत होते जेव्हा ते तळेगाव येथील चेक पोस्ट वरती आले तेव्हा रवी नामक पोलिस अधिकाऱ्याने आडविले ती बाई रडत होती पण साहेबांना त्या माऊलीची थोडीही दया आली नाही शेवटी ते नाईलाजाने खडका-मार्गे परत आले. अशा एक ना अनेक घटना आहे मात्र याच चेक पोस्ट वरुन अशा कितीतरी गाड्या वीना पास सोडण्यात येते कारण येथे साहेबांचा खिसा गरम होतो. पण अजून पर्यंत हे समजण्यास येत नाही चेक पोस्ट ही खडक्या जवळ न करता भिष्णुर् जवळ का ?

हा प्रश्नार्थक चिन्ह आहे. साहेब हे कोरोना योद्धा आहे तर फक्त आणि फक्त रुग्णांकरिताच का अवैध धंदे वाल्या च्या गाड्या साहेबांना का दिसत नाही साहेबांनी अर्थपूर्ण पट्टी डोळ्यावर बांधली आहे का? असे एक ना अनेक प्रश्न तळेगावातील सुजाण नागरिक करीत आहे. व याकडे वरिष्ठ अधिकारी काय कारवाई करतील याकडे सुद्धा तळेगाव व परिसरातील नागरिक वाट पाहत आहे. अशीच घटना काल दिनांक 17 रोजी घडली. तळेगाव येथील काही पत्रकार मंडळी खडका येथे बातमी घेण्याकरिता जात होते. जाताना त्यांनी चेक पोस्ट वरती असणाऱ्या साहेबांना माहिती दिली व ते निघून गेले काही वेळाने परत आले असता पोलीस उपनिरीक्षक रवी मनोहर यांनी अडविले व मला तुमची गाडी चेक करायचे आहे म्हणून सांगितले तेव्हा स्थानिक पत्रकारांनी साहेबांना नम्रतेने विनवणी केली पण साहेबांचा पारा खूपच चढला होता. गाडीची डिकी खोलता की तुमच्यावर एक एफआयआर दाखल करू अशी धमकी वजा इशारा साहेबांनी दिला तेव्हा स्थानिक पत्रकारांनी गाडी चेक करू दिली तेव्हा अशी कुठल्याही प्रकारची दारू किंवा संशयास्पद वस्तू साहेबांना आढळली नाही तेव्हा साहेब आणखीनच भडकले व आता तुम्ही ताबडतोब इथून निघून जा नाहीतर खोटा गुन्हा दाखल करून तुम्हाला अडकविल अशी धमकी दिली ज्या पत्रकार महोदयास चौथा आधारस्तंभ म्हटले जाते आणि अशा लोकांना हे पोलीस साहेब अशी तुच्छ वागणूक देतात तर सर्वसाधारण नागरिकांचे काय हा प्रश्न उभा होतो.