Home विदर्भ रोग प्रतिकार शक्ती वाढण्यासाठी आयुष विभागाच्या सूचनाचे पालन करावे – विवेक भीमनवार

रोग प्रतिकार शक्ती वाढण्यासाठी आयुष विभागाच्या सूचनाचे पालन करावे – विवेक भीमनवार

106

सौ.पदमाताई प्रभाकर मुंजेवार

आयुष विभागांतर्गत गोळया, काढाचे निशु:ल्क वितरण

वर्धा – कोविड 19 या साथीच्या प्रतिबंधाकरीता आयुष विभागाने रोग प्रतिकार शक्ती वाढविण्यासाठी मार्गदर्शक सूचना निर्गमित केल्या आहेत. आर्युवेद, होमिओपॅथी, युनानी व योग चिकित्सा पध्दतीचा अवलंब केल्यास रोग प्रतिकार शक्ती वाढण्यास मदत होईल असे आवाहन जिल्हाधिकारी विवेक भीमनवार यांनी केले आहे.
जिल्हा परिषदच्या आरोग्य विभागाच्या वतीने आयुष विषयक माहिती पत्रक तसेच सामान्य रुग्णालयाच्या आयुष विभागाच्या वतीने रोग प्रतिकार शक्ती वाढविण्यासाठी शासकिय विभाग, पोलिस विभाग व बाहय रुग्ण विभागात येणा-या 9 हजार 230 रुग्णांना होमिओपॅथी औषधीचे वितरण करण्यात आले. तसेच 1 हजार 600 रुग्णांना आयुष काढयाचे निशुल्क वितरण करण्यात आले.
यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी सचिन ओम्बासे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अजय डवले, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. पुरुषोत्तम मडावी, जिल्हा आयुष अधिकारी डॉ. संदिप नखाते, उपस्थित होते.
नागरिकांनी मार्गदशक सूचनांसोबतच वैयक्तिक स्वच्छता, खोकतांना व शिकतांना मास्क किंवा रुमालाने तोंड झाकावे. आजारी व्यक्ती किंवा सर्दी, ताप खोकला असलेल्या व्यक्तींशी संपर्क टाळावा. याशिवाय ताजे भोजन व ऋतुनुसार भाज्या व फळे खावीत. तुळशीची पाने, ठेचलेले अद्रक व हळद ही द्रव्ये पाण्यात उकळून ते पाणी वारंवार पिणे फायदेशिर आहे. सर्दी व खोकल्यासाठी चिमूटभर काळीमीरी चूर्ण मधातून सेवन करावे. प्रशिक्षित योगतज्ञांच्या मार्गदर्शनाखाली योगासने व प्राणायम यांचा सराव करावा. मुग डाळ पाण्यात उकळून तयार केलेले मुगाचे गरम कढण, सुप, पाणी प्यावे. 150 मिलीलिटर गरम दुधात अर्धा चमचा हळद व अर्धा चमचा सुंटीचे चुर्ण मिसळून हे दुध दिवसातून एकदा किंवा दोनदा प्यावे.
रोग प्रतिकार शक्ती वाढीसाठी व रोग प्रतिबंधासाठी उपचार
1)आयुर्वेद औषधी- संशमनी वटी 500 मिली ग्रॅम) 1 गोळी दिवसातून दोनदा 15 दिवस,
2) आयुष काढा– तुळस 4 भाग, सुंठ दोन भाग, दालचिनी दोन भाग, व काळीमीरी 1 भाग या द्रव्यांच्या भरड चुर्ण तयार करावे हे चुर्ण उकळलेल्या पाण्यात मिसळून पाणी थंड झाल्यावर गाळून 15 दिवस सेवन करावे.
3) रोज सकाळी 10 ग्रॅम चवनप्राश सेवन करावे. मधुमेह रुग्णांनी शुगर फ्री चवनप्राशनचा वापर करावा.
4) युनानी औषधी काढा – जोशंदा (घटक द्रव्ये- बिहीदाना, उन्नाब,सपीस्तान, करंजवा) बिहिदाना 05 ग्रॅम, बर्गे गावजबान 07 ग्रॅम, उन्नाव 07 दाणे, सपीस्तान 07 दाणे, दालचिनी 3 ग्रॅम, बनपशा 05 ग्रॅम यांचा काढा , जोशंदा या घटकद्रव्यांना 150 मिलीलीटर पाण्यामध्ये 15 मिनिटे उकळवावे व गरम असतांना चहाप्रमाणे दिवसातून 1 किंवा 2 वेळा 15 दिवसांकरिता सेवन करावे.
5) होमिओपॅथीक -अर्सेनिक अल्बम 30- 4 (ग्लोब्युल्स) गोळया उपाशीपोटी दिवसातून दोनदा , असे तीन दिवस सलग सेवन कराव्या. एक महिन्याचे अंतराने पुन्हा तीन दिवसांचा कोर्स करावा.
या करीता डॉ. नितीन मेशकर, मिलींद सज्जनवार, डॉ. चंद्रकांत जाधव, डॉ.मंगेश भोयर, डॉ. संकल्प हूमने, डॉ. भूषण म्हैसकर, डॉ. मधुरा सज्जनवार, डॉ. कुणाल चंदनखेडे, डॉ. अमोल देशपांडे यांनी सहकार्य केले. तसेच जिल्हा आरोग्य अधिकारी कार्यालयातील अधिकारी कर्मचारी यांना आयुष काढयाचे वाटप करण्यात आले.