Home महत्वाची बातमी साहेब आमच्या गावा कडे ही पहा हो , ???

साहेब आमच्या गावा कडे ही पहा हो , ???

141

सर्व दुकाने बिनधास्त सुरू ,

सोशल डिस्टनसिंग ची ऐसी तैसी ,

अमीन शाह ,

आज एक बातमी वाचली , साहेब उतरले रस्त्यावर , फारच चांगले वाटले मनाला सुखद धक्का बसला की आपण आपल्या जिल्ह्यात करोना रोग पसरवू नये म्हणून विशेष लक्ष देत आहात दिवस रात्र एक करत आहात साहेब खरच आपला कार्य अभिनंदनास पात्र आहे या करोना च्या काळात काही नेते घरी बसून आपले कार्य करीत आहे आपण मात्र आमच्या साठी आमच्या आरोग्यासाठी रस्त्यावर उतरून जी भागदोड परिश्रम करीत आहात त्या बद्दल आम्ही आपले उपकार मानतो मात्र साहेब आपल्याच मतदार संघातील साखरखेर्डा , सेंदुर्जन , दुसरबीड , येथे आपल्या कडक लोकडाऊन च्या आदेशाचे उल्लंघन सुरू असल्याचे दिसत असून येथे काही दुकाने वगळता सर्व दुकाने दिवसभर सुरू असतात लोक ही विना मास्क खरेदी साठी गर्दी करीत आहे सोशल डिस्टनसिंग च्या नियमाची अंमलबजावणी होतांना येथे दिसत नाही गर्दी करणाऱ्या लोकांवर कोणाचाही अंकुश नसल्याचे दिसत आहे , जिल्हाधिकारी मॅडम यांनी 1 जुले रोजी एक आदेश काढून काही वयवसाय व दुकानावर प्रतिबंध घातले होते मात्र प्रतिबंधित वयवसाय खुले आम सुरू असल्याचे दिसत आहे , हा सर्व प्रकार सुरू असतांना खरोखरच करोना रोगाचा संक्रमण थांबणार का ???करोना ची चैन तुटणार का ?? सिंदखेडराजा येथील चेक पोस्ट वरून अनेक लोक जालना , औरंगाबाद येथून व डोंनगाव जवळ असलेल्या चेक पोस्ट वरून अकोला वाशीम येथून आपल्या कडे अनेक जण आलेले आहेत येत आहेत प्रशासनाने त्यांची शोध मोहीम राबवून तपासणी करण्याची गरज आहे साखरखेर्डा येथून 8 किलो मीटर अंतरावर असलेल्या वडगावमाळी या गावात सध्या करोना चा उद्रेक सुरू असून येथील अनेक करोना बाधित रुग्ण सध्या उपचार घेत आहे रोज अनेक लोकांची तपासणी येथे केली जात असून अनेक जण होम कारणटाईन आहेत मात्र येथील अनेक लोक रोज साखर खेर्डा येथे रोज भरणाऱ्या बाजारात खरेदी व बँके च्या कामासाठी येथे येत आहे त्या मुळे करोना मुक्त झालेला साखरखेर्डा शहर पुन्हा गोत्यात येण्याची भीती वयकत केली जात आहे ,येथील रस्ते नेहमी गर्दीने गजबजलेले दिसतात साहेब आमच्या गावा कडे ही पहा हो अशी मागणी काही जागरूक लोक करीत आहे ,