Home विदर्भ आलेगाव येथे बंदला नागरिकांच शतप्रतिशत प्रतिसाद

आलेगाव येथे बंदला नागरिकांच शतप्रतिशत प्रतिसाद

148

पातुर तालुक्यातील आलेगाव येथे बंदला नागरिकां कडून शतप्रतिशत प्रतिसाद मिळाला आहे.

अकोला – जिल्ह्यात करोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता अकोला जिल्याचे पालकमंत्री बच्चू कडु यांनी तीन दिवस अकोला जिल्ला बंद ठेवण्याचे अकोला जिल्ला प्रशासनाला आदेश दिले होते . त्या अनुषंगाने अकोला जिल्ल्यात दि 17 सांयकाळी 7 वाजे पासून दि 21 सकाळी 7 वाजे पर्यंत अकोला जिल्हा पूर्णपणे बंद देवण्याचे आदेश अकोला प्रशासनाने दिली. या मध्ये दवाखाने मेडिकल सोडून सर्व काही बंद देवण्याचे आव्हान करण्यात आले होते . या आदेशाचे पालन करून आलेगाव येथील नागरिकांनी आपले सर्व व्यवसाय बंद ठेवले .या मध्ये गुजरी लाईन बाजारपेठ शिवाजी चौक , मस्तान चौक,व गावात सुद्धा पूर्ण पणे बंद होता तसेच चांन्नी पोलीस स्टेशन कडून ही नागरिकांना घरी राहण्याचे आव्हान करण्यात आले आहे. दवाखाना मेडिकल वेतरिक्त दुसऱ्या कोणत्याही कामासाठी घरून बाहेर निघालियास कायदेशीर कारवाही करण्यात येणार आहे। तरी चांन्नी पोलीस प्रशासन व ग्रामपंचायत कळून नागरिकांना घरीच राहण्याचे आव्हान करण्यात आले आहे .