Home विदर्भ डॉ. काणे स्मृतीदिनी आयुर्वेदीक वैद्य डॉ. विजय अग्रवाल शक्ती फाऊंडेशन तर्फे सन्मानित…

डॉ. काणे स्मृतीदिनी आयुर्वेदीक वैद्य डॉ. विजय अग्रवाल शक्ती फाऊंडेशन तर्फे सन्मानित…

20
0

यवतमाळ – यवतमाळ येथील सर्व सामान्यांच्या आरोग्याची काळजी घेणारे स्व. डॉ. मधुसूदनजी काणे यांच्या स्मृती दिनानिमित्त यवतमाळ येथील मातोश्री रमाबाई आंबेडकर नगर परिषद आयुर्वेदिक दवाखान्याचे आयुर्वेदिक वैद्य डॉ. विजय प्रल्हादजी अग्रवाल यांना शक्ती फाऊंडेशन यवतमाळच्या वतीने कोरोना योद्धा व उत्कृष्ट रुग्ण सेवेबद्दल सन्मान चिन्ह देऊन सन्मानित करण्यात आले.

या प्रसंगी नगर परिषदेच्या नगराध्यक्षा सौ. कांचन बाळासाहेब चौधरी, न. प. चे नव्याने रुजू झालेले मुख्याधिकारी सुनिलजी बल्हाळ यांच्या विशेष उपस्थितीत सन्मानित करण्यात आले.
यवतमाळ शहरामध्ये सर्व सामान्य नागरिकांना स्व. डॉ. काणे यांनी दिलेल्या रुग्ण सेवेनंतर यवतमाळ येथील मातोश्री रमाबाई आंबेडकर आयुर्वेदिक दवाखान्याचे प्रमुख आयुर्वेदिक वैद्य डॉ. विजय प्रल्हादजी अग्रवाल हे अविरतपणे रुग्णांना सेवा देत असून कोरोना संसर्ग महामारी दरम्यान त्यांनी केलेल्या मोलाच्या कामगिरी बद्दल शक्ती फाऊंडेशनच्या अध्यक्षा प्रियंका बिडकर, उपाध्यक्ष वर्षा मानवतकर, सचिव प्रतिभा पवार, विद्या मडावी , रविता भोवते, राजश्री मानकर, संगीता पुरी, कविता नागदिवे आदिंनी सन्मान चिन्ह व पुष्पगुच्छ देऊन डॉ. विजय प्रल्हादजी अग्रवाल यांचा सत्कार केला व यवतमाळ शहरातील सामाजिक संस्था सदैव नगर परिषदेला सहकार्य करण्यासाठी तत्पर राहिल असे अभिवचन शक्ती फाऊंडेशनच्या अध्यक्ष प्रियका बिडकर यांनी दिले.प्रारंभी हनुमान आखाडा चौक येथे भाजपा उत्तर भारतीय मोर्चाचे जिल्हा अध्यक्ष राकेश मिरा, शक्ती फाऊंडेशनच्या अध्यक्षा प्रियंका बिडकर, साथ फाऊंडेशनचे अध्यक्ष रोशन यादव, सचिव सचिन देशमुख, संदीप बेलखेडे, अमन यादव, बालू मेश्राम आदिंनी डॉ. मधुसूदन काणे यांच्या प्रतिमेला माल्यार्पण करुन स्मृती दिनानिमित्त विनम्र अभिवादन केले.

Unlimited Reseller Hosting