जळगाव

कोरोना महामारी च्या प्रसंगी सुखद धक्का

Advertisements
Advertisements

मनियार बिरादरी च्या प्रयत्नास यश

साखरपुड्याला आले व लग्न लावून गेले

रावेर (शरीफ शेख)

जलगाव – बडोदा गुजरात येथून हमीद शेख व त्यांची सुविद्य पत्नी नर्गिस बी आपले नातेवाईक शेख रशीद गुलाम नबी व वरणगाव चे शरीफ मोहम्मद व महेमुद मोहम्मद या नातेवाईकांसोबत जळगावी एडवोकेट गुलाम अहमद उस्मानिया पार्क यांच्याकडे मुलगी मुस्कान ला बघायला आले होते. सदर बाब मनियार बिरादरीचे अध्यक्ष फारुक शेख व शहराध्यक्ष सय्यद चाँद यांना कळविण्यात आली होती.
सकाळी फारुक शेख हे आपले सहकारी अनिस शाह व मुफ्ती अतिकुर रहेमान यांचे सोबत सालार नगर मधील रहिवासी व चोपडा तालुक्यातील मोहरत येथील तडवी पठाण याचे कोरोना मुळे मृत्यू झाल्याने त्यांचे नमाज ए जनाजा अदा करून कब्रस्थान मध्ये दफन विधी करून त्वरित उस्मानिया पार्क येथे पोहचले.

एडवोकेट गुलाम अहेमद त्यांच्या पत्नी चांद सुलताना वधू मुस्कान बी व त्याचे मामा महमूद शेख बाबू यांच्याशी फारूक शेख,सैयद चाँद, सलीम मोहम्मद व रउफ टेलर यांनी प्रथम चर्चा केली व नंतर व बडोदा येथील आलेल्या पाहुण्यांना विनंती केली की लॉक डाऊन सुरू आहे आपण जरी आज या ठिकाणी साखरपुड्याला आला असला तरी आमचा असा प्रस्ताव आहे की आजचा आपण निकाह करून घ्यावा त्यावर त्यांनी या प्रस्तावावर थोडा वेळ विचार केला ,दूरध्वनीद्वारे चर्चा केली आणि एका तासात होकार कळविला.

फारुक शेख यांच्यासोबत असलेले शहर ए काझी मुफ्ती अतिकउर रहेमान, अनिस शाह तसेच मन्यार बिरादरीचे सैयद चाँद, सलीम मोहम्मद व अब्दुल रहीम हेसुद्धा उपस्थित असल्याने त्याच वेळी साखरपुडा न करता निकाह लावण्यात यावा असे सर्वानुमते ठरले त्याच वेळी त्या क्षणी बिरादरीचे अध्यक्ष फारूक शेख यांनी नवरदेव जावेद शेख यांनी पेढा भरून तोंड गोड केले.

थोड्याच वेळात एडवोकेट गुलाम अहमद यांच्या शेजारी असलेल्या उस्मानिया पार्कमधील मस्जिद ए अश्रूफुल फुका यात निकाह(विवाह) लावण्यात आला इमाम वाकीफ रजा यांनी खुतब ए निकाह पढविला यावेळी वधू तर्फे वकील म्हणून धुळे येथील सलीम शेख दगडू तर वरा तर्फे साक्षीदार म्हणून रशीद गुलामनबी शेख व शरीफ मोहम्मद मणियार यांनी भूमिका पार पाडली.
वधू मुस्कान ने दहा हजार रुपये मेहर बांधले असता वर जावेद हमीद यांनी त्याची त्वरित पूर्तता केली अशाप्रकारे हा एक स्तुत्य असा वैवाहिक कार्यक्रम कोणताही गाजावाजा ,कोणत्याही प्रकारची वरात, दान दहेज न देता फक्त मुस्कान ना जावेदला सुपूर्द करण्यात आले यावेळी उपस्थित सर्व रहिवासी व नातेवाईकांना पेढे मानियार बिरादरी तर्फे देण्यात आले व बडोदा च्या पाहुण्यांचे आभार व्यक्त न करता त्यांच्या ऋणात राहण्याचे फारुख शेख यांनी आभारात कबूल केले.
हा विवाह सोहळा पाहून मुफ्ती अतिक रहमान यांनी डोळ्यात अश्रू आणणारी दुवा केली व नमूद केले की जे निकाहा (विवाह) साडे चौदाशे वर्षांपूर्वी होत होते त्याच प्रकारचे विवाह या लॉक डाऊन मुळे का होईना होत आहे व आमचे अंतिम प्रेषित हजरत मोहम्मद सल्लाल्लाहू अलेही वसल्लम यांची शरियत पूर्ण होत आहे.
या विवाह सोहळ्यासाठी मुस्कान तिची आई चांद सुलताना वडील फातेमा वडील एडवोकेट गुलाम अहमद मामा महमूद शेख बाबू यांची भूमिका अत्यंत महत्त्वाची ठरली तसेच बडोदा हुन आलेले हमीद गनी त्यांची पत्नी नर्गिस बी शेख व मुलगा जावेद यांचीसुद्धा भूमिका सकारात्मक राहिली.
या विवाह सोहळ्यास काद्रिया फाऊंडेशन चे फारूक काद्रि,राष्ट्रवादी चे मझर पठाण,साबीर शेख, आरिफ जनाब,अल हिंद चे अल्ताफ शेख यांची उपस्थिती होती
सदर निकाह (विवाह) ची कारवाई संपताच पुन्हा मोबाईलची बेल वाजली व जिल्हा सामान्य रुग्णालयात सुप्रीम कॉलोनी येथील महिलेचा कोरोना मुळे मृत्यू झाला असून ती बॉडी घेण्यास त्वरित या हा निरोप मिळाला लागलीच या पाहुणे मंडळींना निरोप देऊन फारुक शेख आपले सहकारी अनिश शाह व मुफ्ती अतिकउर रहेमान यांना घेऊन कबरस्तान येथे पोहोचले व सकाळ पासून तिसऱ्या व्यक्ती ची नमाज ए जनाजा अदा केली व नंतर तीचे दफन विधी केले.
अशाप्रकारे सकाळी आठ ते दुपारी दोन वाजे च्या दार्मियान तीन नमाज ए जनाजा पढुन एक स्तुत्य असा साधा निकाह लावण्यात यशस्वी झाल्यामुळे या मृतात्म्यास चिरशांती मिळो अशी प्रार्थना कब्रस्तान मध्ये मुफ्ती अतिकउर रहेमान यांनी केली.

0 Reviews

Write a Review

Advertisements

You may also like

जळगाव

कोविड रुग्णांची अशीही सेवा देणारे योध्दा डॉक्टर – कोविड केअर युनिट तर्फे गौरव – डॉ पराग चौधरी व डॉ पंकज पाटील

रावेर (शरीफ शेख)  जळगाव – शहरातील कोविंड रुग्णांची संख्या वाढत आहे सरकारी रुग्णालय त्यासाठी कमी ...
जळगाव

दहिवद येथे जपानची मियावाकी पध्दतीने वृक्ष लागवडीचा प्रयोग..ग्रामपंचायतीमार्फत १००० देशी वृक्षांची लागवड

अमळनेर –  जपान या देशात मियावाकी पध्दतीमध्ये कमीत कमी जागेत जास्तीत जास्त वृक्ष लागवड केली ...
जळगाव

ऑल इंडिया आदिवासी एम्प्लॉईज फेडरेशन च्या महिला जिल्हाउपाध्यक्ष पदी प्रा जयश्री दाभाडे साळुंके यांची निवड…

रावेर (शरीफ शेख)  ऑल इंडिया आदिवासी एम्प्लॉईज फेडरेशन केंद्रिय कार्यालय प्लॉट नं.३५. गोंडवाना नगर क्र.०२, ...
जळगाव

अमळनेर तालुक्यात सततच्या वादळी पावसाने पिकांचे मोठे नुकसान… मागील वर्षीप्रमाणे यंदाही अतिवृष्टीने तोंडावर आलेला घास जाणार

रजनीकांत पाटील अमळनेर :- यंदा तालुक्यात मोठ्या प्रमाणावर पाऊस झाला असून नदी नाले तलाव तुडुंब ...