Home महत्वाची बातमी आजी बाई हे काय केले हो तुम्ही , ????

आजी बाई हे काय केले हो तुम्ही , ????

200

धक्कादायक घटना ,

अमीन शाह ,

कोल्हापूर जिल्ह्यातील चंदगड तालुक्यातील कडलगे बु , या गावी आज एक धक्कादायक घटना उघडकीस आली असून आजारी पती रोज शिव्या देऊन त्रास देतो म्हणून एक 85 वर्षीय आजी बाई ने 90 वर्षीय पतीला पेटवून देऊन दिले पती मेलयाची खात्री होताच पत्नी ने ही आत्महत्या केली ही धक्कादायक घटना घडल्या मूळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे , या संदर्भात मिळालेल्या माहिती नुसार लक्ष्मण पाटील 90 , पार्वती पाटील 85 हे दोघे आपल्या खोलीत एकटेच रहात होते तर त्यांची दोन मुले हे गावातच वेगळे राहत होते , लक्ष्मण पाटील हे अनेक दिवसा पासून आजारी राहत होते त्यांची पत्नी पार्वती ही त्यांची सेवा करीत होती मात्र ते आपल्या पत्नीस नेहमी शिवीगाळ करून त्रास देत होते याला पार्वती बाई ही फार वैतागून गेली होती अखेर तिने काल रात्री गाढ झोपेत असलेल्या आपल्या पतीवर रॅकेल टाकून त्याला पेटवून दिले पती मेल्याची खात्री होताच त्यांनी ही आत्महत्या केली आज सकाळी लहान मुलगा त्यांच्या घरी गेला असता त्याने आईला हाक मारली त्याला आतून काहीच प्रतिसाद मिळत नसल्या मूळे शेजाऱ्यांच्या मदतीने दरवाजा तोडला असता त्याला हे विदारक चित्र दिसले या प्रकरणी पोलीस पुढील तपास करीत आहे ,