Home विदर्भ अकोट तालुक्यातील तडीपार असलेल्या गुन्हेगारास अटक……

अकोट तालुक्यातील तडीपार असलेल्या गुन्हेगारास अटक……

105

देवानंद खिरकर := अकोला जिल्ह्याचे पोलिस अधीक्षक यांचे पथक अकोट तालुक्यात पेट्रोलिंग व शोध मोहीम करित असतांना गोपनीय माहीती मिळाल्या वरुन तडीपार करण्यात आलेल्या गुन्हेगारांचा शोध घेण्याकरीता शोध मोहीम करित असतांना वडाळी देशमुख येथिल तडीपार गुन्हेगार श्रीधर बंकट पवार वय 52 वर्ष हा गावामधे आलेला आहे.अशा गोपनीय माहिती वरुन आज.3 वाजून 30 मिनिटांनी गजानन महाराज मंदिर वडाळी देशमुख येथे श्रीधर बंकट पवार हा दिसला.याला मा.उपविभागीय दंडाधिकारी साहेब अकोट यांनी आदेश क्रमांक क्रिमिंनल/क्र/मुपो/56(1)/प्रक्र06/2018दि.24/9/2019 अन्वये एक वर्षा करिता अकोला,वाशिम,यवतमाळ,अमरावती,बुलढाणा,या जिल्यातून तडीपार करण्यात आले आहे.आरोपि विरुध्द पो.स्टे.अकोट येथे खूणाचा प्रयत्न,अवैध दारु विक्री,शरीराविरुध्दचे गुन्हे दाखल आहेत.तरी याला एक वर्षा करिता वरील जिल्ह्यामधुन तडीपार करण्यात आले असतांना विनापरवानगी त्याने अकोला जिल्ह्यात प्रवेश केला आहे.त्यामूळे तडीपार इसमाचे हे कृत्य कलम 142 मुंबई पोलिस कायद्यान्वये होत असल्याने त्यांच्या विरुध्द पो.स्टे.अकोट ग्रामीण येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.सदरची कारवाई मा.श्री.जिल्हा पोलिस अधीक्षक जी श्रीधर,अप्पर पोलिस अधीक्षक प्रशांत वाघुंडे यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष पथक अकोला यांनी केली आहे.