Home महत्वाची बातमी झी मराठी या वाहिनीवर फु बाई फु या कार्याक्रामध्ये कीर्तन परंपरेचा अपमान...

झी मराठी या वाहिनीवर फु बाई फु या कार्याक्रामध्ये कीर्तन परंपरेचा अपमान केल्यामुळे संचालन करणारे निलेश साबळे कीर्तनकाराच्या भूमिकेत ऋषिकेश जोशी आणि राधेकेच्या भूमिकेत लीना भागवत यांच्यावर गुन्हे दाखल करावे..

263

युवा विश्व वारकरी सेना अध्यक्ष ह.भ.प.गणेश महाराज शेटे यांची मागणी…..

देवानंद खिरकर

अकोला – दि ६/७/२०२० ला युटूबवर कीर्तन पाहत असताना फु बाई फु सिझन ६ दि १८ जून २०१३ ऋषिकेश जोशी आणि लीना भागवत या नावाने कीर्तनाचा व्हिडिओ पहिला असता, फु बाई फु या कार्याक्रामध्ये कीर्तन परंपरेचा आणि फडकरी संत परंपरेचा अपमान केला असून अश्लील हावभाव करून दुहेरी पद्धतीचे वेभाचारी बोलणे केल्यामुळे वारकरी संप्रदाय चा फार मोठा अपमान केला आहे.

त्याविषयाने काही निवड शब्द पुढीलप्रमाणे आहेत. सर्वात प्रथम निलेश साबळे हे संचालन करित असताना एक बाई एका कीर्तनकार बुवा जवळ जाते आणि निलेश साबळे स्वताच्या जिभेला बोट लावून सांगतात आता या बाईला कोणत सार तिला चाखायला मिळेल असे सांगतात. मग कीर्तनकाराच्या भूमिकेत ऋषिकेश जोशी आले. माउली शब्दाचा प्रयोग करून दिवसभर मी राधा कृष्णाच्या रासलीलेचे व्याखान चालवितो. कीर्तनकाराच्या भूमिकेतून पाव वाजविला आणि राधिकेच्या भूमिकेत लीना भागवत ह्या येवून एकदम कीर्तनकाराच्या जवळ चिकटून उभ्या राहतात आणि कीर्तनकार म्हणतो माझा आधुनिक पाव्याची पावर पहा, पाव वाजवत बरोबर डेरेदार राधा हजार झाली,आणि राधेच्या भूमिकेत असणाऱ्या लीना भागवत यांनी गेली कुठ गावना हि लावणी म्हणायला सुरुवात केली. आणि कीर्तनात समोर बसणारे दाखविले ते श्रोते तमाशात बसलेल्या माणसांप्रमाणे बाईच्या पुढे नोटा दाखवून शिट्या वाजवायला लागले. आणि नाचायला लागले. राधेच्या भूमिकेत लीना भागवत म्हणतात देवाजवळ देण्यासारखे काही म्हणून तुमच्या जवळ आली (अश्लील हावभाव करून) बुवा माझे अध्यात्म करा असे कीर्तनकारांना म्हणते आणि कीर्तनकाराच्या भूमिकेतील ऋषिकेश जोशी म्हणतात तरून आहेस , जवान आहेस , भरलेल्या जामच्या बाटलीसारखी आहेस. राधेच्या भूमिकेतील लीना भागवत सांगतात मला फडाचा, तमाशाचा , लावणीचा कंटाळा आलाय. ज्ञानेश्वर महाराज माउली यांचा उल्लेख करून आरोपी लीना भागवत बोलतात पाटलाच्या वाड्यावर नुसत्या लावण्या करून काही होत नाही पाटील आणि पाटलीन मध्ये फुट पाडली पाहिजे तेव्हा अनुभूती येते म्हणून महाराज मला तुमचा गंडा बांधा. विष्णू भगवंतानी आत्महत्त्या केली असे बरेच अपशब्द वारकरी संप्रदायातील संत कीर्तनकार, फडकरी, राधाजी, विष्णू भगवान यांच्याविषयी वारंवार वापर केल्यामुळे माझे एक वारकरी या नात्याने अंतकरण दुखावले गेले आणि हा व्हिडिओ इतर काही मंडळीनी पाहिल्यामुळे महाराष्ट्रातील वारकरी संप्रदाय फार मोठी खंत व्यक्त करीत आहे. वारकरी संप्रदायमध्ये कीर्तन परंपरेचा नियम संतांच्या प्रमाणे असा आहे कि भक्ती ज्ञानविरहित इतर गोष्टी न कराव्या ! प्रेमभरी वैराग्याच्या युक्ती विवराव्या ! जेणेकरून मूर्ती ठसावी अंतरी श्रीहरीची ! ऐसी कीर्तन मर्यादा आहे संतांच्या घरची ! हि कीर्तनपरंपरा वारकरी संप्रदायची आहे व झी मराठी वरील फु बाई फु या कार्यक्रमाच्या माध्यमातून वारकरी संप्रदायचा उद्रेक होवून हिंसाचार होईल तसेच आरोपीचा बोलण्याचा उद्देश हा संप्रदायमध्ये हिंसाचार व्हावा हा होता व यामधील कलाकारांनी जाणीवपूर्वक वारकरी संप्रदायच्या कीर्तन परंपरेचा धार्मिक श्रद्धेचा अपमान केला व वारकरी संप्रदायच्या भावनांवर अत्याचार करून बुद्धीपुरस्कार व दृष्ट उद्देशाने केलेला आहे आणि म्हणून आम्ही त्यांना शांततेच्या मार्गाने ईमेल पाठविला व फोनवर लीना भागवत यांना महाराष्ट्रातील वारकर्यांच्या भावनांचा विचार करून एक माफीचा व्हिडिओ पाठवा अशी विनंती केली असता मी माझा वकिलाद्वारे उत्तर देईल अश्या रीतीने मग्रुरीने बोलतात. आणि त्यामुळे आमचे मन दुखावलेले आहे. हा व्हिडिओ महाराष्ट्रातील वारकरी मंडळीनी निषेधार्थ फेसबुकवर टाकला त्यामुळे झी मराठी चायनाल माध्यमातून तो त्यांच्या युटूब वरून डिलीट करण्यात आलेला आहे. पण पुन्हा दि १२/७/२०२० ला रात्री ८ वाजताच्या दरम्यान फु बाई फु दुसरा नकली कीर्तनाचा कार्यक्रम दाखवून नट व नटीने कीर्तन परंपरेचा अपमान करण्याचा प्रयत्न केला आहे. व म्हणून आमची आपणास नम्र विनंती आहे कि कलम १५३ अ, कलम २९५ अ, कलम २९८ अ भारतीय दंड सहिता तसेच इन्फोरमेशन टेक्नोलॉजि माध्यमातून गुन्हे दाखल करून कठोर कारवाई करण्यात यावी. माझासारखा हा व्हिडिओ आणखी महाराज मंडळीने पाहिलेला आहे साक्षीदार म्हणून त्यांची नावे खालीलप्रमाणे आणि दिलेल्या रिपोर्टसोबत आपणास सादर व्हिडिओ व्हाटद्वारे पाठवत आहोत.

हभप जगन्नाथ महाराज देशमुख ( विश्व वारकरी सेना प्रदेशाध्यक्ष ) हभप राम महाराज गवारे ( युवा विश्व वारकरी सेना अकोला जिल्हाध्यक्ष ) हभप राहुल महाराज हजारे (युवा विश्व वारकरी सेना वर्धा जिल्हाध्यक्ष)
हभप कृष्णा महाराज वाघूळ ( विश्व वारकरी सेना बुलढाणा जिल्हाध्यक्ष) हभप तुकाराम महाराज भोसले (युवा विश्व वारकरी सेनाराष्ट्रीय प्रवक्ता) हभप नितेश महाराज वाटकर ( युवा विश्व वारकरी सेना नागपूर जिल्हाध्यक्ष)
हभप गजानन महाराज दहीकर (युवा विश्व वारकरी सेना बुलढाणा जिल्हाध्यक्ष)
हभप संतोष महाराज जाधव ( विश्व वारकरी सेना यवतमाळ जिल्हाध्यक्ष ) हभप विठ्ठल महाराज चौधरी ( युवा विश्व वारकरी सेना अमरावती सहजिल्हाअध्यक्ष) हभप मोहन महाराज मेतकर( युवा विश्व वारकरी सेना अमरावती जिल्हाध्यक्ष) हभप सोपान महाराज उकर्डे( युवा विश्व वारकरी सेना अकोला उपजिल्हाध्यक्ष) अर्जदार: हभप गणेश महाराज शेटे (युवा विश्व वारकरी सेना महाराष्ट्र अध्यक्ष).