Home महत्वाची बातमी रामापुरचे तलाठी दिसले का काहो कुनाला….. वरिस्ठ अधिकारी या कडे लक्ष देतिल...

रामापुरचे तलाठी दिसले का काहो कुनाला….. वरिस्ठ अधिकारी या कडे लक्ष देतिल का……

95

देवानंद खिरकर अकोट:= अकोट तालुक्यातील गट ग्राम पंचायत असलेले रामापूर येथिल तलाठी यू.एस.सरदार यांचे निधन झाल्यामुळे रामापूर येथिल तलाठ्यांची जागा ही गेल्या चार महिने पासून रिक्त आहे.मधात तलाठी चव्हाण यांचेकडे रामापुचा चार्ज दिला होता परंतू ते सुध्दा रामापूर येथे रुजू झालेले नाही. या जागेवर अद्यापही नवीन तलाठी यांची नियुक्ती करण्यात आलेली नसल्यामुळे येथिल शेतकरी यांना विनाकारण नाहक त्रास सहन करावा लागत आहे.सद्या नवीन पिककर्जा करिता,व संत्राचा विमा भरणे करिता शेतकर्यांना अत्यंत कागदपत्राची गरज आहे.परंतू रामापूर येथे नवीन तलाठी यांची नियुक्ती न केल्यामुळे सर्व शेतकरी वर्ग हा त्रस्त झालेला आहे.येवढेच नव्हे तर काही शेतकरी यांना 2000 हजार रुपये पी.एम.किसान योजनेचा निधि,व दुष्काळी अनुदानाची कोरडवाहु करिता असलेली 8000 हजार रुपये मदत,फळबाग करिता असलेली 18000 हजार रुपये मदत ची रक्कम अद्यापही शेतकर्याच्या खात्यात जमा झालेली नाही.यामुळे शेतकरी आणखीच हवालदील झाला आहे.रामापुर येथे शासनाने लाखो रुपये खर्च करुन तलाठी निवास कार्यालय बांधले आहे.परंतू रामापूर येथिल तलाठी निवास कार्यालय येथे तलाठी हजरच राहत नाही.ऊलट या ऑफिस मधे संस्थानचे भांडे ठेवण्यात आले आहे.शासनाचे मुख्यालयी हजर राहण्याचे कडक आदेश सुध्दा याची अमलबजावणी का होत नाही ही आचर्याची बाब आहे.शेतकरी हे अकोट येथिल तलाठी ऑफिस मधे चकरा मारत आहेत परंतू तिथच कोणीच दीसत नसल्यामुळे खाली हात वापस यावे लागत आहेत.रामापूरचे काम अकोट येथिल धांडे नामक व्यक्ती हेच गेल्या चार महिने पासून रामापूरचे तलाठ्यांचे काम पाहत आहेत.ही व्यक्ती कुठलाही सरकारी कर्मचारी नाही.असे असतांना धांडे यांचेकडे रामापुरचा चार्ज नेमका कोणी दिला.कोनाच्या वरदहस्ताने,व मर्जीने धांडे हेच काम पाहत आहेत.याची सुध्दा चौकशी करुन कारवाई होणे गरजेचे आहे.शेतकरी हे धांडे यांना भेटलो असता धांडे हे सचिव पायघन यांना भेटा असे सांगतात.सचिव पायघन यांना फ़ोन लावला असता ते म्हणतात सुकळी येथिल कर्मचारी कायकर यांना भेटा.व कायकर यांना भेटले असता कायकर म्हणतात तहसिल वरील राठोड यांना भेटा.राठोड यांना भेटलो असता राठोड हे उध्दट पणाची भाषा शेतकर्यान सोबत बोलतात व लिस्ट पाठवल्या आता ईथ चकरा मारु नका अशी भाषा शेतकर्या सोबत बोलतात.सर्व उड़वा उडवीची उत्तरे देत शेतकर्यांना विनाकारण नाहकत्रास देत आहेत.तरी हा प्रकार लवकरात लवकर थांबवून रामापूर येथे नवीन तलाठी यांची नियुक्त्ती करण्यात यावी अशी मागणी रामापूर येथिल शेतकरी ओंकार सौंदळे,नामदेव मानकर,नामदेव वरठे,भगवान नेवारे,देवानंद खिरकर,प्रकाश टेकाम,आदी शेतकर्याकडून होत आहे.
रामापूर येथे शासनाने लाखो रुपये खर्च करुन तलाठी निवास कार्यालय बांधले परंतू तेव्हा पासून आज परंत ईथ तलाठीच हजर राहत नाहीत.
देवानंद रमेश खिरकर.
शेतकरी.
मला पी एम कीसान योजनेचा एकही हप्ता मिळाला नाही,दुष्काळी मदत सुध्दा मिळाली नाही रामापूरला तलाठी नसल्यामुळे भेटावे कुणाला हा प्रश्न निर्माण झाला आहे.करिता रामापूरला नवीन तलाठी देण्यात यावा
प्रकाष टेकाम रामापूर शेतकरी.