नांदेड

दिव्यांगासाठी राखीव ५ टक्के निधी खर्च न करणा-या ग्रामसेवकांवर कार्यवाही करा…

Advertisements
Advertisements

मजहर शेख

आमदार भिमरावजी केराम यांचे गटविकास अधिका-यांना निर्देश’

नांदेड / किनवट , दि. २४ – दिव्यांगांसाठी राखीव असलेल्या ५ टक्के निधी खर्च करण्याचे शासन आदेश असूनही सदरचा निधी खर्च करण्यास कुचराई व टाळाटाळ केलेल्या ग्रामसेवकांवर कार्यवाही करण्याचे निर्देश आमदार भिमरावजी केराम यांनी किनवट/माहूर पंचायत समितीच्या गटविकास अधिका-यांना दिले आहेत.
दि. २३ जून रोजी किनवट व माहूरच्या गटविकास अधिका-यांना दिलेल्या लेखी पत्राद्वारे वरील निर्देश देण्यात आले असून वरिष्ठांचे आदेश व शासन निर्णयास बगल दिव्यांगांची अवहेलना केल्याचा ठपका सदर निधी खर्च न करणा-या ग्रामसेवकांवर आ. केराम यांनी ठेवला आहे.
दरम्यान सन २०१३ ते २०१८ पर्यंतचा ३ टक्के शासन निर्णयाप्रमाणे व सन २०१८ ते २०१९ ५% निधी दिव्यांग बांधवांच्या खात्यावर जमा करण्याचे मुख्य कार्यकारी अधिकारी जि.प.नांदेड यांना शासनाने निर्देश दिले असल्याचे नमूद करून याबाबत प्रहार दिव्यांग संघटनेकडून आपणास निवेदन मिळाले असल्याचेही गटविकास अधिका-यांना दिलेल्या पत्रात म्हटले आहे. तथापि,
१) महात्मा गांधी रोजगार हमी योजनेचे जॉब कार्ड देवून त्यांच्या सोईनुसार रोजगार उपलब्ध करून देणे यासह २) तालुक्याच्या ठिकाणी दिव्यांग भवन उभारणे व ३) बेघर दिव्यांगांना विनाअट घरकुल योजनेचा लाभ द्यावा… आदी दिव्यांग बांधवांच्या प्रमुख मागण्यांची पुर्तता करण्यासाठी योग्य त्या कार्यवाहीबरोबरच ग्राम पंचायत स्तरावरील ५% निधी जमा करण्यास टाळाटाळ करणा-या ग्रामसेवकांवर कार्यवाही करण्याचे निर्देश आमदार भिमरावजी केराम यांनी किनवट व माहूर च्या गटविकास अधिका-यांना लेखी पत्राद्वारे दिले आहेत…

0 Reviews

Write a Review

Advertisements

You may also like

नांदेड

लोहा उपजिल्हा रुग्णालयास वसुधरारंत्न राष्ट्रसंत डॉ. शिवलिंग शिवाचार्य महाराज यांचे नाव धावे.

पञकार संरक्षण समीती नांदेड दक्षिण विभाग यांची मागणी  नांदेड :- लोहा उपजिल्हा रुग्णालयास वसुधरारंत्न राष्ट्रसंत ...