Home जळगाव जळगाव कोविंड केअर युनिट चा स्तुत्य उपक्रम…

जळगाव कोविंड केअर युनिट चा स्तुत्य उपक्रम…

152

नशिराबाद येथे न भुतो न भविष्यती असे वैद्यकीय शिबीर संपन्न…

६७५६ ची स्क्रिनिंग टेस्ट व ११२६ ची वैद्यकीय तपासणी…

रावेर (शरीफ शेख)

जळगाव कोविड केअर युनिट मार्फत आज जे नशिराबादला वैद्यकीय शिबीर व सर्वेक्षण करण्यात येत आहे ते खरोखरच अत्यंत उपयुक्त व कोरणा सारख्या रोगराईला आळा घालणारे आहे असे स्पष्ट मत जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष लालचंद पाटील यांनी उद्घाटन करताना सांगितले.
अध्यक्षस्थानी असलेल्या उपविभागीय अधिकारी तथा व विभागीय दंडाधिकारी दीपमाला चौरे यांनी जळगाव हुन आलेले २७ डॉक्टरांचं तसेच कोविंड केअर युनिटचे प्रशासनातर्फे अभिनंदन करून त्यांचे कौतुक केले व जळगाव जिल्ह्यात अशाप्रकारे लोकांचे सर्वेक्षण व वैद्यकीय शिबिर झाल्यास आपण निश्चितच कोरोना ला मत देऊ असे मत व्यक्त केले.
नशिराबाद नगरीचे प्रथम नागरिक विकास पाटील यांनी युनिटचे तथा डॉक्टरांचे आभार सोबतच नशिराबादकरांनी जे सहकार्य केले तसेच पुढील वैद्यकीय शिबिर लवकरच आयोजित करू व जळगावच्या याच डॉक्टरांना आम्ही पुनश्च बोलवु अशी विनंती सुद्धा केली.
या शिबिरात एकूण ६७५६ लोकांची स्क्रिनिंग टेस्ट व ११२६ लोकांची वैद्यकीय तपासणी करण्यात आली

या शिबिराचे प्रास्ताविक कोविड केअर युनिटचे जनसंपर्क प्रमुख फारुक शेख यांनी केले तर युनिट चे अध्यक्ष गफ्फार मलिक यांनी सहा दिवसाचा वैद्यकीय शिबिराचा आढावा सादर केला यावेळी ग्रामपंचायतीचे सर्व सदस्य त्यात प्रामुख्याने विनोद रंधे, सय्यद नजीर अली, सत्तार पहिलवान, आफ्रिदी शेख, प्रकाश माळी, नामदेव माळी, अरुण भोईर, देवेंद्र पाटील, नशिराबाद पोलिस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक कापडणीस, व या शिबिराचे समनव्याक बरकत अली ,मोबिन पठाण, तसेच उर्दू शाळा क्रमांक एक चे जुनेद कासार, फैजुल पिरजादे, सय्यद अहमद अली, नशिराबाद शिसगर बिरादरीचे शेख असिफ ,सैयद निसार,मोहम्मद फजल, शेख इस्माईल, शेख ताहेर, मोहम्मद अबूबकर, शेख कलीम ,अब्दुल हक मुस्तफा शेख ,रउफ हाजी, शेख याकूब बिस्मिल्ला,रऊफ महबूब यांनी परिश्रम घेतले.

औषधी स्टॉल चे उदघाटन

या शिबिराचे वैशिष्ट्य म्हणजे नशिराबाद येथील एक सर्वसामान्य मेकॅनिक अब्दुल महमूद मेकॅनिक यांनी या केअर युनिट ला पुढील कॅम्प च्या औषधी साठी पाच हजार रुपयांचे आर्थिक सहाय्य केले त्याबद्दल त्यांचे व अब्दुल रहीम डायमंड टेलर चे युनिट तर्फे आभार व्यक्त करण्यात आले.
सदरचे शिबिर यशस्वी करण्यासाठी नशिराबाद येथील वैद्यकीय अधिकारी डॉक्टर चेतन अग्निहोत्री यांचे विशेष सहकार्य लाभले त्याचप्रमाणे ग्रामपंचायत व प्राथमिक आरोग्य केंद्र येथील कर्मचारी वर्गाने सुद्धा हे शिबीर यशस्वीतेसाठी प्रयत्न केले

रुग्णासाठी योद्धा म्हणून सेवारत जळगाव चे अनुभवी डॉक्टर ची टीम

सात दिवसा पासून सेवारत डॉ फारूक शेख व डॉ सौ सायका शेख,डॉ फिरोज अहेमद व डॉ सौ नसीम शेख, डॉ निशात कौसर, डॉक्टर रियाज शेख, डॉक्टर जावेद शेख, डॉ मिनहाज पटेल, डॉ सईद अहेमद,डॉ इरफान खान,डॉक्टर अझीझुल्ला शेख, डॉक्टर मोईज देशपांडे, डॉक्टर असीम खान, डॉक्टर कामील शेख, डॉक्टर वसीअहमद, डॉक्टर फारुख सलीम, डॉक्टर रइस कासार, डॉक्टर रिजवान खाटीक, डॉक्टर रमीज खाटीक, डॉक्टर एजाज शाह, डॉक्टर जावेद मोसिर खान , डॉक्टर नसीम फिरोज खान,डॉ नदीम नजर,डॉ नदीम रहेमानी,डॉ वसीम शाह डॉ तौसिफ बिस्मिल्लाह,डॉ इकबाल शेख,डॉ अलीम बागवान,डॉ सौ आफ्रिन शेख,डॉ कु सायमा अस्लम खान, डॉ मतीन खाटीक,डॉ वसीम शाह,डॉ अब्दुल वहाब, डॉ सकीब शेख,डॉ शोएब सईद पटेल,डॉ अल्ताफ खान, व डॉ निलोफर शेख यांनी आपल्या वेळे अनुसार वेलरुग्णांची तपासणी केली.

यशस्वी ते साठी जळगाव करांचे परिश्रम

आमिर शेख, अर्षद शेख व साबीर शेख यांच्या नेतृत्वात अझर हुसेन,मुजाहिद खान,अकिल शेख इब्राहिम पिरजादे, व शेख अझीम यांनी नोंदणी चे कार्य पार पडले तर अतिक शेख च्या नेतृत्वात हुजेफा शेख,खालिद शेख,हमजा शेख,सैयद वसीम,उमर मुख्तार व फैझान शेख यांनी औषधी वाटप केले.
तर अलहिंद चे अल्ताफ शेख,ईदगाह चे अनिस शाह,तय्यब शेख,जुलकर नैन,जलीस शाह,मोहसीन शेख,रफिक शेखयांनी सहकार्य केले.