Home विदर्भ अलेगावात बाहेर गावातुन येत आहे अवैध रेती , पहाटे चार ते पाच...

अलेगावात बाहेर गावातुन येत आहे अवैध रेती , पहाटे चार ते पाच वाजता होत अवैध रेतीची वाहतुक

93

प्रा.मो. शोएबोद्दीन

अकोला – पातूर तालुक्यातील आलेगाव येथे भर रस्त्याने अवैध रित्या रेतीची वाहतूक होते ,आणि ही अवैध रेती बाहेर गावातुन आलेगाव परिसरात पुरविली जाते.सकाळी चार ते पांच वाजता या अवैध रेतीची वाहतुक केली जाते .विशेष म्हणजे अवैधरेतीचा दलाल आलेगाव येथील असुन दिवसा आलेगाव पोलीस चौकीत ठिय्या मारून बसलेला असतो आलेगाव पोलीस चौकीचे कर्मचारी सोबत आपली साठ गाठ असल्याची चर्चा स्वतः दलाल गावात फिरून करतो अशी चर्चा नागरिक करत आहे. हा दलाल पोलीस चौकीत करतो तरी काय आणि अशे दलाल जर पोलीस चौकीत येऊन बसणार तर आम नागरिकांवर याचा काय परिणाम होणार, अशी चर्चा सुद्धा नागरिक करत आहे. तरी याकळे समबंधीत विभागाने लक्ष देऊन योग्य कार्यवाही करण्याची गरज आहे.