Home राष्ट्रीय यावर्षी भारतवासी मुस्लिम बांधव हज यात्रा करू शकणार नाहीत…!

यावर्षी भारतवासी मुस्लिम बांधव हज यात्रा करू शकणार नाहीत…!

132

1932 नंतर झाले असे

अमीन शाह

कोरोना व्हायरसमुळे यावेळेस सौदी अरब हजयात्रेत जगभरातील लाखो मुस्लिम सहभागी होऊ शकणार नाहीत.

सौदी अरब सरकारकडून सोमवारी ही घोषणा करण्यात आली की, या वर्षी खुपच मर्यादीत संख्येत लोक हजयात्रा करू शकतील. यामध्ये सौदी अरबमध्ये राहणारेच लोक प्रामुख्याने सहभागी होतील.
पुढील महिन्यात हजयात्रा होणार आहे. मुस्लिमांना जीवनात एकदा तरी हजयात्रा करणे महत्वाचे मानले जाते, यामुळे संपूर्ण जगातून मुस्लिम समजाचे लोक ही यात्रा सुरू होण्याची वाट पहात असतात. यात्रेच्या काही महिने अगोदर रजिस्ट्रेशन प्रक्रिया सुरू होते, या वर्षी ही प्रक्रिया सुरू असतानाच कोरोनामुळे यात अडथळा आला.
रजिस्ट्रेशन प्रक्रियेवर प्रतिबंध
यात्रेच्या अनेक महिने अगोदरच रजिस्ट्रेशन प्रक्रिया सुरू होते, या वर्षीसुद्धा प्रक्रिया सुरू होती, पण ती थांबवण्यात आली आहे. ही यात्रा करणारे लोक आपल्या उत्पन्नातील एक हिस्सा राखून ठेवतात, अशा लोकांसाठी ही निराशाजनक बातमी आहे.
1932 च्या नंतर प्रथमच मर्यादित संख्येत यात्रा
सौदी अरबने म्हटले आहे की, 1932 च्या नंतर प्रथमच हजयात्रेवर प्रतिबंध आणण्यात आला आहे. यापूर्वी सुद्धा युद्ध आणि भयंकर महामारीच्या आजारांमुळे ही यात्रा रद्द करण्यात आली आहे. परंतु, 1800 नंतर यावर जास्त परिणाम झाला नव्हता. त्यावेळी कॉलरा आणि प्लेगसारख्या आजारांचा प्रकोप पसरला होता. या कारणामुळे सुद्धा मोठ्यासंख्येने लोक येऊ शकले नव्हते.
यावेळी यात्रा पूर्णपणे रद्द केलेली नाही, परंतु सुरक्षेच्या दृष्टीने एकूणच यात्रेकरूंची संख्या कमी केली आहे. यात्रेचे संचलन करणारे हज मंत्रालय आणि उमराह राज्य सरकार द्वारे संचालित सौदी प्रेस एजन्सीने दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, यावर्षी केवळ सौदी अरेबिया आणि अन्य राष्ट्रांच्या नागरिकांचे यात्रेत स्वागत केले जाईल जे आधीपासूनच येथे वास्तव्यास आहेत.

मागील वर्षी 24.9 लाख लोकांनी केली यात्रा
सौदी जनरल अथॉरिटी फॉर स्टॅटिस्टिक्सच्या म्हणण्यानुसार गेल्या वर्षी 24.9 लाख यात्रेकरूंनी हजयात्रा केली. 18.6 लाख यात्रेकरू सौदी अरेबिया बाहेरुन हजसाठी आले होते. तीर्थयात्रेत सामील होण्यासाठी जगभरातील लोक हवाई आणि इतर मार्गाने येथे पोहोचतात. यामुळे येथे प्रचंड गर्दी होते. रात्री, बरेच लोक तंबू किंवा इतर गर्दीच्या ठिकाणी एकत्र झोपतात आणि जेवण एकत्र करतात. याशिवाय हे लोक हज करून घरी परततात तेव्हा तेथील लोकही मोठ्या संख्येने जमा होतात आणि त्यांची भेट घेतात.

सौदी अरेबियासाठी हज यात्रा ही मोठ्या धार्मिक मेळाव्यासारखी आहे. जगभरातून कोट्यवधी हज यात्रे करू येथे येतात, यामुळे सौदी अरेबियालाही भरपूर उत्पन्न मिळते. परंतु यावेळी हज यात्रेकरूंच्या कमी संख्येमुळे सौदी अरेबियाच्या आर्थिक स्थितीवरही परिणाम होणार आहे. सरकारी आकडेवारीनुसार हज यात्रेसाठी आणि उमराहला अंदाजे 1200 कोटी डॉलर वार्षिक कमाई होते.
सौदी अरेबियाचे राजे प्रिन्स मोहम्मद बिन सलमान म्हणाले की, अर्थव्यवस्थेचा विचार करता प्रवाशांची संख्या वाढविण्यावर विचार केला जावा. राज्याला सध्या अधिक उत्पन्नाची आवश्यकता आहे, कारण तेलाच्या कमी किंमतींमुळे उत्पन्न कमी झाले आहे. सौदी अरबने अर्थव्यवस्थेला हानीसह लॉकडाऊन करून कोरोना व्हायरसवर नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न केला आहे.
लॉकडाऊनचा आर्थिक व्यवहारांवर परिणाम
कोरोना व्हायरसवर नियंत्रण मिळवण्यासाठी सौदी सरकारने अनेक भागात लॉकडाऊन देखील केले, ज्यामुळे सरकारचे आर्थिक नुकसान झाले आहे. अपेक्षा होती की, तीर्थयात्रा पुन्हा भरवली जाईल, आणि आर्थिक तुट भरून निघेल पण तिलाही आता ग्रहण लागले आहे. व्हायरसचा संसर्ग रोखण्यासाठी फेब्रुवारीमध्ये मक्का आणि मदीनामधील पवित्रस्थळे सरकारने बंद केली आहेत.
एप्रिलमध्ये एका सौदी अधिकार्‍याने यात्रेकरूंना एक इशारा दिला होता की, त्यांनी यावर्षी आपली हजयात्रेची योजना रद्द करावी. आता सौदी सरकारच्या घोषणेने त्या यात्रेकरूंना नाराज केले आहे ज्यांनी यावर्षी यात्रा करण्याचे नियोजन केले होते. ज्या मुस्लिमांनी बांधवांनी वर्षानुवर्षांची बचत करून प्रवासासाठी बुकिंग केले होते त्यांना आता पुढील वर्षापर्यंत थांबावे लागणार आहे.
हजयात्रा जगातील सर्वात मोठ्या धार्मिक उत्सवांपैकी एक जुलैच्या उत्तरार्धात भरणारी ही तीर्थयात्रा जगातील सर्वात मोठ्या धार्मिक कार्यक्रमांपैकी एक आहे. यावेळी जगातील सुमारे 20 लाखांहून अधिक मुस्लिम सौदी अरेबियात जातात आणि धार्मिक कार्यक्रमात सहभागी होतात. जगातील सर्वात जास्त मुस्लिम लोकसंख्या असलेल्या इंडोनेशियाने यंदा आपल्या नागरिकांना हजमध्ये भाग घेण्यास मनाई केली आहे. इंडोनेशियातील सुमारे 2,20,000 लोक दरवर्षी या यात्रेत सहभागी होतात.