
प्रतिनिधी – प्रशांत नाईक
अमरावती – जिल्ह्यातील धामणगांव रेल्वे शहरातील कॉटन मार्केट चौकात एक इसम अवैध दारू विक्री करत असल्याच्या गुप्त माहिती दत्तापूर पोलिसांना मिळाली त्या माहितीच्या आधारे स्थानिक पोलिसांनी सापळा रचून अवैध दारू विक्री करणाऱ्या दोन आरोपीना अटक केली असून त्या आरोपी जवळून देशी व विदेशी दारूचा साडे पाच हजार किमतीचा दारू साठा जप्त करण्यात आला आहे.
आरोपीना अटक करण्यात आली असून पुढील तपास दत्तापूर पोलीस करत आहे .










































