Home मराठवाडा कोरोना महामारी च्या धर्तीवर शैक्षणिक वर्ष सुरू, ग्रामीण भागातील विद्यार्थी संभ्रमात

कोरोना महामारी च्या धर्तीवर शैक्षणिक वर्ष सुरू, ग्रामीण भागातील विद्यार्थी संभ्रमात

162

लक्ष्मण बिलोरे – घनसावंगी

जालना – कोरोना महामारीच्या संकटामुळे संपूर्ण जग हैराण असून आपल्या देशातील विविध क्षेत्रात विपरीत परिणाम झाला आहे. विशेष म्हणजे लाॅकडाउनमुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. शैक्षणिक वर्ष सुरू झाले प्राथमिक शाळेत मुलांना पुस्तकांचे वाटप करण्यात आले मात्र ग्रामीण भागातील शाळकरी मुले संभ्रमात पडली आहेत.

गेल्यावर्षी प्राथमिक शिक्षण घेणाऱ्या मुलांचे कोरोना महामारी मुळे मोठे शैक्षणिक नुकसान झाले आहे फेब्रुवारीपर्यंत मुलांचा अभ्यास व शिकवणी योग्य होते परंतु महाराष्ट्रात कोरोना विषाणूचा शिरकाव झाल्यापासून सर्व प्राथमिक शाळा बंद करण्यात आल्या होत्या त्यांच्या परीक्षासुद्धा रद्द करण्यात आल्या . लहान वयात योग्यवेळी योग्य शिक्षणाची लहान मुलांना त्यांच्या शैक्षणिक वाढीसाठी अत्यंत आवश्यक असते परंतु गेल्यावर्षी कोरणा संकटामुळे मुलांचे शिक्षण अर्धवट झाले, आता १५ जून पासून शासनाच्या धोरणानुसार नवीन शैक्षणिक वर्ष सुरू करण्यात आले असून प्राथमिक वर्गाचे प्रवेश घेणे सुरू केले आहे. पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांना घरी अभ्यास करण्यासाठी पुस्तके वाटप करत आहेत.
कोरोना महामारी मुळे घनसावंगी तालुक्यातील बऱ्याच शाळेत बाहेरगावाहून आलेले लोक कोरंटाईन करण्यात आले होते. ह्या बाबीचा व कोरोना संकटांचा लहान मुलावर चांगलाच परिणाम झालेला पहायला मिळत असून आपण शिकत असलेल्या वर्गाची परीक्षा न देता आपण पुढील वर्गात कसे गेलो आहोत, असा प्रश्न पडल्याने आश्चर्य वाटत आहे, कोरोना महामारीचा संसर्ग होऊ नये म्हणून शासनाने केलेल्या प्रचार व प्रसार लहान मुलांपर्यंत पोहोचला असून ते आता शाळा सुरु होण्या अगोदर शाळेची स्वच्छता व निर्जंतुकीकरण फवारणी करण्याची व मास्क सॅनिटायझर पुरवण्याची मागणी करत आहेत. ह्याबाबत कुंभार पिंपळगाव जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या विद्यार्थ्यांशी संवाद साधला असता त्यांनी शासकीय नियमाचे पालन करत शाळा सुरू करण्यात यावी असे मत व्यक्त केले आहे.