Home जळगाव न्युज १८ इंडिया आमिष देवगन यांच्यावर गुन्हा नोंदवा-पोलिस अधीक्षक यांना साकडे

न्युज १८ इंडिया आमिष देवगन यांच्यावर गुन्हा नोंदवा-पोलिस अधीक्षक यांना साकडे

45
0

रावेर (शरीफ शेख)

न्युज १८ इंडिया चे कार्यकारी संपादक आशिष देवगन यांनी हिंदू मुस्लिमांचे आदरणीय असलेले सुफी संत ख्वाजा गरीब नवाज त्यांच्या बद्दल अपशब्द व बदनामीकारक वृत्त १६ जून ला प्रसारण केले व त्यांच्या विरोधात पूर्ण भारतात संतापाची लाट उसळली असता १७ जून पासून जळगाव शहर व जिल्ह्यात विविध पक्ष,सामाजिक व धार्मिक संघटनेने यांच्या विरोधात एफ आय आर व तक्रार दाखल केली परंतु दुर्दैवाने जळगाव जिल्ह्यातील ३३ पोलीस स्टेशन पैकी कोठेही तक्रार दाखल न झाल्याने जळगाव जिल्हा मानियार बिरदारीचे फारूक शेख, एम आय एम चे नगर सेवक रियाझ बागवान,काद्रिया फाउंडेशन चे फारूक काद्रि,सिकलगर बिरदारीचे अनवर खान, काँग्रेस चे नदीम काझी व राष्ट्रवादीचे मझर खान व जामा मस्जिद ट्रस्ट चे तय्यब शेख यांनी पोलीस अधीक्षकांना साकडे घातले असता त्यांनी आपण सहा पोलीस अधीक्षक यांच्याशी चर्चा करा आम्ही नक्की कारवाई करू असे आश्वासन दिल्याने त्वरित सहा पोलीस अधीक्षक निलाभ रोहन यांची भेट घेऊन त्यांना त्वरित न्युज १८ इंडिया चे संचालक व अँकर आमिश देवगन यांच्या विराधात भा द वि १५३ अ,२९५ अ,३४,१२० ब,५०५(२) प्रमाणे गुन्हा नोंदवावा अशी मागणी केली .
या प्रकरणी वरिष्ठांशी चर्चा करून कारवाई करतो असे आश्वासन निलाभ रोहन यांनी दिले

Unlimited Reseller Hosting