Home नांदेड नांदेड जिल्ह्यात आज पुन्हा ७ रुग्णांना सुट्टी, तर पाॕझेटिव्ह रूग्ण ४ वाढले,...

नांदेड जिल्ह्यात आज पुन्हा ७ रुग्णांना सुट्टी, तर पाॕझेटिव्ह रूग्ण ४ वाढले, यात ५ वर्षीय बालकाचा समावेश

167

नांदेड , दि. २३ ( राजेश एन भांगे ) – जिल्ह्यात मंगळवार दिनांक 23 जून 2020 रोजी पंजाब भवन कोविड केअर सेंटर नांदेड येथील 1 रुग्ण डॉ. शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपुरी नांदेड येथील 5 रुग्ण तसेच औरंगाबाद येथे संदर्भित झालेला 1 रुग्ण असे एकूण 7 रुग्ण बरे झाल्यामुळे त्यांना सुट्टी देण्यात आलेली आहे. त्यामुळे सुट्टी देण्यात आलेल्या आतापर्यंतच्या रुग्णांची संख्या आता 245 एव्हढी झाली आहे.

मंगळवार 23 जून रोजी प्राप्त झालेले एकूण 40 अहवाला पैकी 28 अहवाल निगेटिव्ह प्राप्त झाले आहेत. व तसेच यातील 4 रुग्ण पॉसिटीव्ह आढळून आल्यामुळे जिल्हातील एकूण पॉसिटीव्ह रुग्णांचा आकडा 321 वर पोहोचला आहे.
आज सापडल्याचा रुग्णांमध्ये दोन महिला, एक पुरुष, अन एका 5 वर्षीय बालकाचा समावेश.

आज सापडलेल्या रुग्णाचा तपशील खालील प्रमाणे :

☑️ बिलाल नगर भागातील एक महिला रुग्ण : वय 50, / नांदेड एक महिला रुग्ण
☑️ बोरबन फॅक्टरी नांदेड येथील एक पुरुष रुग्ण : वय 35,
☑️रा.समर्थ नगर जि. सोलापूर येथील एक बालक : वय 5
नांदेड आरोग्य विभागाच्या कोरोना प्रसिद्धी पत्रकानुसार सदरील चार रुग्णांचा तपशील अश्या पद्धतीचा आहे, व या सर्व रुग्णांची प्रकृती सध्या स्थिती स्थिर सांगण्यात आले आहे.

आतापर्यंत 321 बाधितांपैकी 245 बाधितांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली आहे. तर 14 प्रतिसाद न दिल्यामुळे मृत्यू झाला आहे. उर्वरीत 62 रुग्णांवर औषधोपचार चालू आहेत. यातील चार बाधितांची प्रकृती गंभीर स्वरुपाची आहे. 50 व 52 वर्षाच्या दोन स्त्री रुग्ण व 52 व 54 वर्षाचे दोन पुरुष यांचा यात समावेश आहे. तर 6 बाधित व्यक्ती उपचारासाठी औरंगाबाद येथे संदर्भित करण्यात आले आहेत.

✔️नांदेड जिल्ह्यातील एकूण कोरोना अहवाल.

☑️ आज दिवसभरात 4 पॉझिटिव रुग्णांची भर.
☑️ एकूण रुग्ण संख्या 321वर.
☑️ दिवसभरात 7 रुग्णांना सुट्टी.
☑️ आत्तापर्यंत 245 बरे होऊन घरी
☑️ 2 पॉसिटीव्ह रुग्ण फरार.
☑️14 कोरोना पॉसिटीव्ह रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू.
☑️62 रुग्णांवर उपचार सुरू.
☑️ 2 महिला 2 पुरुष रुग्णाची प्रकृती चिंताजनक
☑️ 6 रुग्ण उपचारास्तव औरंगाबाद येथे संदर्भीत.
☑️पुणे-हैद्राबाद-आदिलाबादचे 4 रुग्ण उपचारास्तव नांदेड येथे संदर्भित.

रविवार 23 जून रोजी 89 व्यक्तींचे स्वॅब तपासणीसाठी पाठविण्यात आले असून त्यांचा अहवाल उद्या सायंकाळी पर्यंत प्राप्त होईल असे नांदेड आरोग्य विभागाच्या प्रसिद्धी पत्रकात नमूद केले आहे.

✅️ नांदेड आरोग्य विभागाचे महत्त्वाचे आवाहन!

दरम्यान जनतेने घाबरुन न जाता गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळून सतत हात धुणे व मास्कचा वापर करणे आवश्यक आहे. हा आजार संसर्गजन्य असल्यामुळे प्रत्येक व्यक्तींने आपल्या वर्तनात बदल करुन स्वत: सुरक्षितेची अधिक काळजी घेतली पाहिजे. रोजच्या जीवनात आपण ज्या काही वस्तू बाहेरुन आणतो त्याची योग्य ती स्वच्छता केली पाहिजे. भाजीपाला घेतल्यास तो स्वच्छ करुन किमान 12 तास न वापरता स्वच्छ जागी ठेवून आपल्या आहाराप्रतीही अधिक सजग राहून नागरिकांनी दक्षाता घेण्याचे आवाहन जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. निळकंठ भोसीकर यांनी केले आहे.