Home विदर्भ अवैध रेती वाहतूक करणाऱ्या गाडी मालकावर कारंजात तहसीलदाराची कारवाई…!

अवैध रेती वाहतूक करणाऱ्या गाडी मालकावर कारंजात तहसीलदाराची कारवाई…!

116

आरिफ़ पोपटे – कारंजा

वाशिम – कारंजा शहरांमध्ये दिवसेंदिवस कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. शहरातील वाढलेल्या कोरोना रुग्णांची संख्या थांबवण्यासाठी महसूल विभागाचे सर्व कर्मचारी रात्रंदिवस काम करत आहे. पण शहरातील अवैध रेतीचा व्यवसाय करणारे आपला व्यवसाय थांबण्यास तयार नाही. सविस्तर माहिती अशी की मंगरूळपीर रोड वरील शिंध पेट्रोल पंपच्या मागे थदद्नी यांची अंदाजे 30/35 ब्रास रेती सील करण्यात आली होती. थदद्नी यांनीही रेती इतरांना विकल्याची माहिती महसूल विभागाला मिळाली.तेव्हा शूक्रावारी राञी 10:30 वाजता तहसिल चे कम॔चारी व पटावरी गुल्हाने , मुकुंद , लोखंडे,नागोलकर,धानोरकर,कोकाटे हे घटनास्थळी पोहचले तेव्हा तिथे MH 04DS 8766 व MH 04 EB 0220 क्रमांकच्या दोन टाटा एस गाडया रेती भरलेल्या दिसल्या. तहसील चे कर्मचारी दिसताच दोन्ही गाडी चालक मोबीन वहीद पटेल व साजिद वहीद पटेल या दोघांनी व इतरांनी तेथून पळ काढला तेव्हा तहसील कर्मचारी यांनी कारंजा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक सतीश पाटील यांना तेथे बोलावले व पुढील कारवाई केली.