Home नांदेड नांदेड कोविड” शनिवारी २३ रूग्णांना सुट्टी, ४ पाॕझेटिव्ह ची भर, तर एकाचा...

नांदेड कोविड” शनिवारी २३ रूग्णांना सुट्टी, ४ पाॕझेटिव्ह ची भर, तर एकाचा मृत्यू ; एकूण बरे झालेले रूग्ण दोनशेपार

122

नांदेड , दि २० ( राजेश एन भांगे ) – जिल्ह्यात पावसाळ्याच्या तोंडावरच कोरोना व्हायरसने डोके वर काढायला सुरुवात केली आहे. व दिवसागणिक कोरोना रुग्णसंख्येत वाढ होत असतानाच मृत्यूचा आकडा देखील दिवसागणिक वाढत आहे, ही नांदेडकरांसाठी चिंतेची बाब असली तरी दिलासादायक बाब म्हणजे जिल्ह्यात बरे होऊन घरी गेलेल्या रुग्णांनी द्विशतक देखील पार केले आहे.

त्यामुळे शनिवार दिनांक 20 जून 2020 रोजी पुन्हा पंजाब भवन कोविड केअर सेंटर नांदेड येथील 15 रुग्ण तसेच मुखेड कोविड केअर सेंटर येथील 8 असे दिवसभरात 23 रुग्ण बरे झाल्यामुळे त्यांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आलेली आहे. त्यामुळे सुट्टी देण्यात आलेल्या आतापर्यंतच्या रुग्णांची संख्या 209 एवढी झाली आहे.

आज शनिवार 20 जून रोजी प्राप्त झालेल्या एकूण 77 अहवालापैकी 62 निगेटिव अहवाल प्राप्त झाले, त्यामध्ये 4 रुग्ण पॉझिटिव्ह आढळून आल्यामुळे जिल्ह्यातील एकूण रुग्ण संख्या आता 301 एवढी आहे. परंतु पुणे येथून 2 कोरोना बाधित महिला रुग्ण वय वर्ष 12 व 16 तसेच मंडई नांदेड येथील रहिवासी असणारी महिला वय वर्षे 45 ज्या हैद्राबाद येथून संदर्भित करण्यात आलेली आहे. अश्या तीन रुग्णांची वाढ झाल्यामुळे नांदेड जिल्ह्याची कोरोना बाधित रुग्णांची एकूण संख्या आता 304 एवढी झाली आहे.

आज सायंकाळी प्राप्त झालेल्या अहवालानुसार या 4 पॉझिटिव्ह रुग्णांमध्ये तीन पुरुष व एका महिलेचा समावेश आहे. तर यातील एका पुरुष रुग्णाचा मृत्यू झाला आहे.

नांदेडात आज आढळलेले सदरील रुग्ण खालील भागातील आहे :
☑️ राजनगर येथील एक पुरुष रुग्ण : वय वर्ष – 38
☑️ रहेमत नगर येथील एक पुरुष रुग्ण : वय वर्ष -48
☑️ भगतसिंग रोड येथील 1 महिला रुग्ण : वय वर्ष – 55
☑️पिरबुऱ्हाण नगर येथील एक पुरुष रुग्ण : वय वर्ष 62 मृत्यू
असे आज एकूण 4 रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह आढळले आहेत.

तर पिरबुऱ्हाण नगर येथील 62 वर्षीय रुग्णाचा मृत्यू हा शुक्रवार दि 19 जून 2020 रोजी झाला असून. त्या रुग्णाचा कोरोना अहवाल त्याच्या मृत्यू पश्चात पॉझिटिव्ह प्राप्त झाल्याचे नांदेड आरोग्य विभागा कडून सांगण्यात आले आहे.

आतापर्यंत 304 रुग्णांपैकी 209 रुग्णांना रुग्णालयातून सुटी देण्यात आलेली आहे व 14 रुग्णांनी उपचारास प्रतिसाद न दिल्यामुळे त्यांचा मृत्यू झाला आहे. उर्वरित 81 रुग्णांवर औषधोपचार चालू असून त्यातील 4 रुग्णांची प्रकृती गंभीर स्वरूपाची आहे.
या रुग्णांमध्ये 2 स्त्री रुग्ण ज्यांचे वय वर्ष 50 व 52 आणि 2 पुरुष ज्यांची वय वर्ष 52 व 54 आहेत. तर 6 रुग्णांना उपचारस्तव औरंगाबाद येथे संदर्भित करण्यात आले आहे.

✔️नांदेड जिल्ह्यातील एकूण कोरोना अहवाल.

☑️ आज दिवसभरात 4 पॉझिटिव रुग्णांची भर.
☑️ एकूण रुग्ण संख्या 304 वर.
☑️ दिवसभरात 23 रुग्णांना सुट्टी.
☑️ आत्तापर्यंत 209 बरे होऊन घरी
☑️ 2 पॉसिटीव्ह रुग्ण फरार.
☑️14 कोरोना पॉसिटीव्ह रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू.
☑️81 रुग्णांवर उपचार सुरू.
☑️ 2 महिला 2 पुरुष रुग्णाची प्रकृती चिंताजनक
☑️ 6 रुग्ण उपचारास्तव औरंगाबाद येथे संदर्भीत.
☑️पुणे-हैद्राबादचे 3 रुग्ण उपचारास्तव नांदेड येथे संदर्भित.
#Playmarathinews

शनिवार दिनांक 20 जून 2020 रोजी 45 स्वॉब तपासणीसाठी पाठवण्यात आलेले आहेत त्यांचे अहवाल उद्या संध्याकाळपर्यंत प्राप्त होतील असे नांदेड आरोग्य विभागाच्या प्रसिद्धीपत्रकात नमूद केलेले आहे.

✅️ नांदेड आरोग्य विभागाचे महत्त्वाचे आवाहन!

दरम्यान जनतेने घाबरुन न जाता गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळून सतत हात धुणे व मास्कचा वापर करणे आवश्यक आहे. हा आजार संसर्गजन्य असल्यामुळे प्रत्येक व्यक्तींने आपल्या वर्तनात बदल करुन स्वत: सुरक्षितेची अधिक काळजी घेतली पाहिजे. रोजच्या जीवनात आपण ज्या काही वस्तू बाहेरुन आणतो त्याची योग्य ती स्वच्छता केली पाहिजे. भाजीपाला घेतल्यास तो स्वच्छ करुन किमान 12 तास न वापरता स्वच्छ जागी ठेवून आपल्या आहाराप्रतीही अधिक सजग राहून नागरिकांनी दक्षाता घेण्याचे आवाहन जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. निळकंठ भोसीकर यांनी केले आहे.

सरद माहिती २० जुन सायं ५ वा.च्या प्राप्त माहिती नुसार.