Home विदर्भ “दखल पोलीसवाला” , राष्ट्रीय राजमार्गा वरील दिशा दर्शक फलकाची दुरुस्ती…!

“दखल पोलीसवाला” , राष्ट्रीय राजमार्गा वरील दिशा दर्शक फलकाची दुरुस्ती…!

388

देवानंद जाधव

यवतमाळ – नागपूर तुळजापुर या 361 क्रमांकाच्या राष्ट्रीय महामार्गावर यवतमाळ तालुक्यातील भांब राजा येथे प्राधिकरणाने रस्त्याच्या दुतर्फा लावलेल्या दिशा दर्शक फलकावर चुकीची माहिती देण्यात आली होती. या चुकीचे प्रतिबिंब पोलीसवाला ऑनलाईन मिडिया मध्ये नुकतेच ऊमटले होते. भांब राजा या गावच्या पश्चिम दिशेला ” चांदापुर “नावाचे गाव आहे. पण मार्गावरील दिशादर्शक फलकावर “चंद्रपुर “असा ऊल्लेख केल्याने, नागपूर, वर्धा, यवतमाळ, आरणी माहुर मार्गावरुन तुळजापुर ये जा करणारे वाहन धारक आणि प्रवासी गोंधळून जात होते.

विशेषतः परप्रांतीय वाहन धारक बुचकळ्यात पडत होते. वाहन धारकांना अनेकदा चंद्रपुर समजुन चांदापुर येथे विनाकारण हेलपाटा मारुन मनस्ताप सहन करावा लागला. यवतमाळ ते आर्णी मार्गावरुन नेहमी ये जा करणार्या वाहन धारकांना त्या दिशादर्शक फलकावरील चुकीचा काही फरक पडला नाही. माञ अन्य देशभरातील वाहन धारकांना अनेकदा ञास सहन करावा लागला. अखेर या गंभीर चुकीची पोलीसवाला ऑनलाईन मिडियाने वृत्त प्रसिद्ध केले आणि राष्ट्रीय महामार्गावरील दिशा दर्शक फलकावर चुकीची माहिती दुरुस्त करण्यासाठी, राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरणाचे डोळे उघडले. त्यांनी सुध्दा बातमी ची दखल घेत दिशादर्शक फलकावरील चुकीची दुरुस्ती केली, त्यामुळे आता वाहन धारकांमध्ये समाधान व्यक्त केले जात आहे.