Home जळगाव चिनावल येथील मशिदी जवळ घाणीचे साम्राज्य , नागरिकांचे आरोग्य धोक्यात…!

चिनावल येथील मशिदी जवळ घाणीचे साम्राज्य , नागरिकांचे आरोग्य धोक्यात…!

482

रावेर (शरीफ शेख)

रावेर तालुक्यातील चिनावल येथील मस्जिद च्या समोर घाणीचे साम्राज्य पसरले आहेत. अगोदरच जिल्ह्यात कोरोना ने थैमान घातले आहे त्यातच अशा प्रकारच्या घाणी मुळे रोगराई पसरण्याची शक्यता नाकारता येत नाही जून च्या पहिल्याच आठवड्यात पावस सुरू झाला आहे तरी सुद्धा या परिसरात सफाई झालेली नाही. कुंभारखेड़ा चौफुली पासून ते खिज़र ऊर्दू हाय स्कूल पर्यंत नालेसफाईचे काम अपुर्णच आहे दर वर्षी पावसाळ्यात ह्या नाल्या द्वारे सर्व घाण मशिदी जवळ व हायस्कूल जवळ येऊन जमा होताना दिसते तसेच नाल्या मुळे मच्छरांचा प्रचंड त्रास मस्जिद कडील लोकांना सहेन करावा लागत आहे मुस्लिम समाज बांधव नमाज पठाण साठी या पुलाचा वापर करत असुन या नाल्यातील दुर्गंधीला सामोरे जावे लागत आहे तसेच मस्जिदी मध्ये नमाज पठण करताना नाल्याच्या दुर्गंधीचा नमाजी लोकांना खुप त्रास सहेन करावा लागत आहे ग्राम पंचायत कार्यलयात अर्ज देउन ही नालेसफाईचे चे काम होत नाही,ग्राम पंचायत मार्फत लवकरात लवकर सफाई करण्याची मागणी ग्रामस्थां मार्फत करण्यात येत आहे.