Home विदर्भ यवतमाळातील महाराष्ट्र सैनिकांनी ठोकला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला अखेरचा राम – राम

यवतमाळातील महाराष्ट्र सैनिकांनी ठोकला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला अखेरचा राम – राम

165

यवतमाळ – महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे वाघापुर विभागाचे मा. विभाग अध्यक्ष असलेले संदिप भिसे यांच्या सह अनेक पदाधिकाऱ्यांनी पक्ष सोडल्याने वाघापुरात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या माध्यमातून अनेक युवकांची एक फळी तयार करुन त्यांनी वाघापुर विभागातील प्रश्न मार्गी लावले आहे. त्यांच्या वतिने आजवर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतिने स्व-खर्चाने अनेक नाविन्यपूर्ण उपक्रम राबविले असुन त्यांच्या ह्या उपक्रमाची प्रसिद्धी कुष्णकुंज पर्यंत झाल्याने मोठ्या नेत्यांनी त्याची पाठ थोपटली आहे. यासह वाघापुर परिसरातील सर्वसामान्यांच्या सोडविण्यासाठी शासन दरबारी विवीध निवेदने सादर करुन अनेक समस्यांचे निराकरण केले आहे. गेल्या दिड दोन वर्षांपासून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यवतमाळात आले असता संपुर्ण जिल्हा कार्यकारिणी बरखास्त केल्यापासुन जिल्हाध्यक्ष वगळता एकही नियुक्ती आत्ता पर्यंत न झाल्याने अनेक महाराष्ट्र सैनिक नाराज असल्याचे चित्र दिसत असतांना तसेच स्थानिक पदाधिकाऱ्यांच्या एकाधिकारशाही कंटाळून अखेर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला जय महाराष्ट्र केल्याचे सांगितले आहे.

विशेष म्हणजे यवतमाळ जिल्ह्यात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे दोन राज्य उपाध्यक्ष असतांना महाराष्ट्र सैनिकांच्या कुठल्याही अडचणी सोडल्या जात नसल्याची खंत त्यांनी बोलुन दाखविली.राज्य उपाध्यक्ष का एका विधानसभा क्षेत्रापुरतेच मर्यादित आहे कि विदर्भातील ईतर जिल्ह्यातील महाराष्ट्र सैनिकांच्या अडचणी जाणुन घेण्याचे त्यांचे कर्तव्य असतांना त्यांच्या अडचणीकडे जाणुन बुजून दुर्लक्ष केल्या जाते हा मात्र गंभीर प्रश्न आहे.मात्र गेल्या दिड वर्षांपासून यवतमाळ जिल्ह्याची कार्यकारिणी बरखास्त असुन एकमेव जिल्हाध्यक्ष पद साबुत ईतर कुठलीही कार्यकारिणी जाहीर करण्यात आली नसल्याने गेल्या जवळपास दोन वर्षात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा वर्धापन दिन,गणतंत्र दिन,शिव जयंती,डाॅ.बाबासाहेब आंबेडकर जयंती,स्वातंत्रदिन,महाराष्ट्र नवनिर्माण महिला सेनेचा वर्धापन दिन किंवा ईतर महापुरुषांच्या जयंती असा एक ही उपक्रम आपल्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतिने राबविण्यात आला नाही.तसेच पक्ष वाढीच्या व पक्षाचे ध्येय धोरणे,तसेच वरिष्ठपातळीवरील सर्वसामान्य नागरिकांच्या समस्यांना न्याय मिळत नसल्याने पदाधिकारी त्रस्त होते.मात्र राज ठाकरेंचा वाढदिवस,राज ठाकरेंच्या सभा,अधिवेशन या वेळी मात्र शासकिय अधिकाऱ्यांकडुन वसुली करण्याकरिता सक्रिय असलेले असतात मात्र ईतर वेळी फरार असलेल्या पदाधिकाऱ्यांना कोण पाठीशी घालत आहे हा संशोधनाचा विषय आहे.सैनिकांकडुन होत होता.या नंतर अनेक महाराष्ट्र सैनिक पक्ष सोडण्याची तयारीत असुन आधीच बोटावर मोजण्या ईतके महाराष्ट्र सैनिक यवतमाळ शहरात असतांना जर त्यांना ही पक्ष सोडला तर जिल्हाध्यक्षा शिवाय कोणी उरणार कि नाही असे चित्र दिसते.वाघापुर विभागातील संदिप भिसे सह त्यांचे खंदे समर्थक सौरव पत्रकार,प्रणय डोईजड,हरीश कोहळे,सारंग सुलभेवार,गणेश खताडे,विक्की बानोरे,शिवाजी पुरी आदींनी पक्ष सोडल्याचे सांगितले असुन वाघापुर विभागात महाराष्ट्र नवनिर्माण सेना संपल्याचे जणु चित्र दिसते.