विदर्भ

पराग पिंगळे यांचा वाढदिवस सामाजिक उपक्रमांनी साजरा

Advertisements
Advertisements

रक्तदान, अन्नदान, तसेच अनाथांसाठी धावले कार्यकर्ते..

यवतमाळ – शिवसेनेचे यवतमाळ जिल्हाप्रमुख पराग पिंगळे यांचा वाढदिवस कोरोनाच्या संकटामुळे त्यांच्या कार्यकर्त्यांनी रक्तदान, अन्नदान करुन तसेच गोरगरीब, विधवा महिला, अनाथ मुलांना कपडे वाटप करुन साजरा केला. अभूतपुर्व अशा संकटात वाढदिवसाच्या निमित्ताने नागरीकांचे दुःख कमी करण्याचा हा प्रयत्न कौतुकास्पद ठरला आहे.

कोरोना संकटामुळे नागरीकांवर उपासमारीची पाळी आली आहे. त्याअनुषंगाने शिवसेनेचे जिल्हाप्रमुख पराग पिंगळे यांनी मोठया प्रमाणात अन्नदान कार्यक्रमात सहभाग घेऊन नागरीकांना दिलासा देण्याचे कार्य केले.

आता त्यांच्याच वाढदिवसानिमित्त कुठलाच गाजावाजा न करता सामाजिक उपक्रमांनी वाढदिवस साजरा करण्याचा निर्णय त्यांच्या कार्यकर्त्यांनी घेतला होता. त्याअनुषंगाने दिनांक 7 जुन रोजी लोहारा येथील प्रभाग 14 मधील नगर सेवक निलेश बेलोकर यांनी रक्तदान शिबिराचे आयोजन केले. पराग पिंगळे यांचा 44 वा वाढदिवस असल्याने शिवाजी नगर लोहारा येथील 44 रक्तदात्यांनी रक्तदान करुन त्यांना अनोख्या पध्दतीने शुभेच्छा दिल्या. पराग पिंगळे फॅन्स क्लब च्या वतीने हृषीकेश सराफ, वसीम मवाळ तसेच कार्यकर्त्यांनी सकाळी 10.30 वाजता कोरोना काळात सेवा देणाऱ्या पोलिस बांधवांना फेस शिल्ड, सॅनिटायझर तसेच मास्कचे वाटप केले. सकाळी 11 ते दुपारी 1 वाजेपर्यन्त यवतमाळ शहरातील सर्व शिवभोजन केंद्रावर आवश्यक असलेले पाच रुपये गरीब नागरीकांकडून न घेता त्यांना मोफत शिवभोजन देण्यात आले. यावेळी जवळपास 1 हजार गरीब नागरिकांनी शिवभोजन थाळीचा लाभ घेतला. देवी नगर येथे फिरोज पठाण मित्र परीवाराने 74 विधवा महिलांना साडी चोळी देऊन त्यांचा सन्मान केला. यावेळी पराग पिंगळे यांनी सुध्दा विधवा महिलांचे चरणस्पर्श करुन आशीर्वाद घेतले. सायंकाळी 5 वाजता पांढरी येथे 70 अनाथ व गरीब मुलांना कपड्यांचे वाटप करण्यात आले. जिल्हा सामान्य रुग्णालयातील रुग्णांच्या नातेवाईकांना अन्नदानाचा कार्यक्रम घेण्यात आला. योगेश भांदक्कर व अतुल कुमटकर तसेच त्यांच्या मित्र परिवाराने जवळपास 700 नागरीकांना अन्नदान दिले. यासह अनेक सामाजिक उपक्रम करुन पराग पिंगळे यांचा वाढदिवस साजरा केल्याने समाजातून सुध्दा पराग पिंगळे यांच्या मित्र परिवाराचे कौतुक केले जात आहे.

*अनेकांनी दिल्या शुभेच्छा*

पराग पिंगळे यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांना सकाळी 11 ते 2 या वेळेत पंचायत समिती सभापती निवास येथे शेकडो शिवसैनिक, पदाधिकारी, लोकप्रतिनिधी, अधिकारी वर्ग यांनी शुभेच्छा दिल्या.प्रत्यक्ष व
भ्रमणध्वनी द्वारे मा. ना. संजय राठोड, मा. खा. हेमंत पाटील, जिल्हाप्रमुख विश्वास नांदेकर, जिल्हाप्रमुख राजेंद्र गायकवाड, मराठवाडा समन्वयक विश्वनाथ नेरुरकर,विदर्भ समन्वयाक अरविंद नेरकर,महिला आघाडी जिल्हा संपर्क प्रमुख शिल्पाताई देशमुख,युवासेना यवतमाळ जिल्हा विस्तारक दिलीप घुगे विधानसभा संपर्क प्रमुख दिलीप कदम, विजयानंद पेडणेकर, दशरथ मांजरेकर, अंबादास जोशी, किरण परुळेकर, नगराध्यक्ष कांचनताई चौधरी, कालींदाताई पवार, अध्यक्ष जिल्हा परिषद, विजय राठोड, श्रीधर मोहोड, शैलेश ठाकूर,पंचायत समिती सभापती कांताताई कांबळे, गजानन बेजंकीवार,नगर परिषद गटनेता गजानन इंगोले सागरताई पुरी, निर्मलाताई विनकरे, लताताई चंदेल, मंदाताई गाडेकर,जिल्हा परिषद सदस्य चितांगराव कदम, विनोद खोडे, सचिन राठोड, किशोर इंगळे, रुपेश कल्यामवर, विष्णू उकंडे, आतिष राठोड, डॉ बाबूसिंग चव्हाण, व्यापारी आघाडी जिल्हा संघटक प्रवीण निमोदीया,उपजिल्हा प्रमुख गजानन डोमाळे, उमाकांत पापीनवार, बळीराम मुटकुळे, राजेश खामनेकर, प्रवीण शिंदे, तालुका प्रमुख संजय रंगे, मनोज सिंगी,उत्तममामा ठवकर, सतीश नाईक,विनोद काकडे, प्रमोद भरवाडे, रवी राठोड,विद्यार्थी सेना जिल्हा संघटक अभि पांडे,शहर प्रमुख संदीप ठाकरे,राजू राठोड,राजू दुधे,पंकज शिवरामवार,मनोज ढगले,महिला आघाडीच्या सागरताई पुरी, कल्पना दरवई,माधुरिताई अराठे या सह शिवसेनेतील पदाधिकारी, युवासेना, महिला आघाडी पदाधिकाऱ्यांनी अभिष्ठचिंतन केले. याव्यतिरीक्त काँग्रेस जिल्हाध्यक्ष आ. वझाहत मिर्झा, राष्ट्रवादी कॉग्रेस जिल्हाध्यक्ष ख्वाजा बेग तसेच काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस व महाविकास आघाडी कार्यकर्ते, प्रमुख पदाधिकारी व लोकप्रतिनिधींनी तसेच पत्रकार व सामाजिक क्षेत्रात काम करणाऱ्या संघटनांनी वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या.

*कार्यकर्त्यांचे नियोजन*

वाढदिवस सामाजिक उपक्रमांनी साजरा करण्यासाठी मोठया संख्येत कार्यकर्त्यांनी आधीपासून नियोजन केले. यामध्ये अतुल कुमटकर, योगेश भांदक्कर, निलेश बेलोकर, फिरोज पठाण, हृषीकेश सराफ,विशाल गणात्रा सह ऍड अभिजित बायस्कर, राजेश टेंभरे, गिरीश व्यास, संजय उपगनलावार, ,अनिल यादव,तुषार देशमुख, संगीता पुरी, विनोद पवार, वाहतूक सेना उपजिल्हा प्रमुख शैलेश गाडेकर, अभिनव वाडगुरे, मंगेश भालेराव, जयराम पवार, प्रभाकर बहादूरे, शाम थोरात, अतुल कुमटकर, अनिल यादव, प्रवीण निमोदीया, पंकज देशमुख, शाम जाधव, संजय नेमाडे, सचिन बारस्कर, शंकर देउळकर, राजेंद्र कोहरे, सतीश सकट,शाम चंदेल, चेतन शिरसाठ, अमोल धोपेकर, संतोष चव्हाण, दीपक सुकळकर, रवी बोचरे, राजू राऊत, उद्धवराव साबळे, गोलू जोमदे, राजू शेख,मामा महल्ले,गोपाल अग्रवाल, रवी राऊत, प्रसन्न रंगारी, सुरेश चुनारकर, प्रतीक पिंपळकर, शैलेंद्र तांबे, कुणाल देशपांडे,आकाश वांढरे, पप्पू गजभे, जोतीताई चिखलकर, गार्गी गिरडकर, कुणाल चव्हाण, अमित मेहरे, जयराज बहादुरे, प्रसाद अवसरे, योगेश काटपेलवार, राजेंद्र गावंडे, जितेंद्र उके, हेमंत उगले, अभय व्यास, अर्पित घुगरे, अतुल बोबडे यांनी परीश्रम घेतले.

0 Reviews

Write a Review

Advertisements

You may also like

विदर्भ

अकोला जिल्ह्यात प्रसूती झालेल्या महीलेला व तिच्या बाळाला उपचारासाठी चक्क बैलगाडीतून करावा लागला प्रवास…  

    अकोट. देवानंद खिरकर स्वातंत्र्याला ७४ वर्ष उलटली मात्र गावखेड्यातील वाहतूक परिस्थिती अजून हि ...
विदर्भ

संस्थात्मक अलगीकरणात राहण्यास इच्छुक नसलेल्या अतिसौम्य लक्षणे असणा-या रुग्णांना गृहअलगीकरणात राहण्याची परवाणगी

योगेश कांबळे वर्धा , दि.22 – सध्या जिल्हयात कोरोना बाधितांची संख्या वाढत आहे. अशा परिस्थितीत ...
विदर्भ

भांब (राजा) चा टोल नाका वाहन धारकांचे खिसे हलके करण्यासाठी सज्ज…!

देवानंद जाधव  यवतमाळ , (मंगरूळ) – नागपूर तुळजापुर या 361क्रमांकाच्या राष्ट्रीय महामार्गावर यवतमाळ पासुन बावीस ...