Home जळगाव अरविंद बनसोडे यांची हत्या करणा-याला कठोर शासन करुन ,फाशी देण्यात यावी …

अरविंद बनसोडे यांची हत्या करणा-याला कठोर शासन करुन ,फाशी देण्यात यावी …

149

वंचित बहुजन आघाडीची निवेदना द्वारे मागणी

रावेर (शरीफ शेख)

वंचित बहुजन आघाडी नागपूर येथील अरविंद बनसोडे यांची हत्या करणा-याला कठोर कारवाही करुन ,फाशी देण्यात यावी या मागणीचे निवेदन वंचित बहुजन आघाडीच्या रावेर तालुक्याच्या,भारिप बहुजन महासंघ,शहर आघाडी,महिला आघाडी, युवक आघाडीच्या वतीने तहसिलदार व पी.आय.रावेर यांना देण्यात आले.
तहसिलदार व पोलिस स्टेशनचे पी.आय यांना दिलेल्या निवेदनात असे म्हटले आहे.नागपुर येथे वचित बहुजन आघाडी कार्यकर्ता अरविंद बनसोडे यांची हत्या करण्यात आली. यांची हत्या कोणी केली व का केली त्यांच्या हत्ये मागे राजकीय पुढारी याचा हात आहे का ? याचा तपास लकरात लवकर करावा. पुरोगामी फुले,शाहू,आंबेडकर यांच्या महाराष्ट्रात गेल्या चार पाच वर्षापासुन बौध्द,ओ.बी.सी.,एस.टी.,एन.टी या समाज्यावर अन्याय होत आहे.
तरी गुंड प्रवृत्तीच्या लोकांना सरकार कठोंर शासन करत नाही. म्हणून पुरोगामी महाराष्ट्रामध्ये व भारतामध्ये दिवसेनदिवस अन्याय होत आहे. तरी नागपुर येथील अरविंद बनसोडे यांच्या हत्या करणा-यांना पकडून कठोर शासनकरण्यात यावे या मागणीचे निवेदन वंचित बहुजन आघाडीच्या रावेर तालुक्याच्या,भारिप बहुजन महासंघ,शहर आघाडी,महिला आघाडी, युवक आघाडीच्या वतीने तहसिल कर्मचारी किशोर चौधरी व पोलिस स्टेशनचे ए.पी.आय.शितलकुमार नाईक यांना देण्यात आले.दिलेल्या निवेदनावर वंचित बहुजन आघाडी रावेर तालुका अध्यक्ष बाळु शिरतुरे,उपाध्यक्ष गौतम अटकाळे,अमोल अटकाळे,जगन्नाथ करवले,नरेंद्र गाढे, सलीम शाह यासिन शाह,कैलास धनगर,श्रावण पाटील,सुकदेव तायडे, किशोर सुरदास,रफिक बॅग यांच्या सह्या आहे.