Home मराठवाडा अंबड- घनसावंगीचे माजी आमदार अण्णासाहेब उढाण यांचे निधन..

अंबड- घनसावंगीचे माजी आमदार अण्णासाहेब उढाण यांचे निधन..

235

लक्ष्मण बिलोरे – घनसावंगी

जालना – जालना जिल्ह्यातील अंबड – घनसावंगीचे माजी आमदार अण्णासाहेब आंबादासराव उढाण यांचे जालना निवासस्थानी आज सोमवारी सकाळी ९.३० वाजेच्या सुमारास निधन झाले.मृत्यू समयी त्यांचे वय ९३ वर्षे होते. त्यांच्या पश्चात मुलगा निळकंठ,पाच मुली ,सुना नातवंडे असा मोठा परिवार आहे. सायंकाळी सहा वाजता उढाण कंडारी येथे अंत्यविधी करण्यात येणार आहे. – – *हे पण वाचा*: दिवंगत आण्णासाहेब दादा उढाण म्हणजे एक धाडसी व्यक्तीमत्व होते. सत्तरच्या दशकात दादांचा जबरदस्त दरारा राहिला. त्याकाळी अंबड-घनसावंगी विधानसभा मतदारसंघात ‘ दादा ‘ शिवाय पान हलत नव्हते. दादांचा निर्णय पक्का असायचा , तुटेल पण वाकणार नाही,असा त्यांचा बाणा होता. समोरची व्यक्ती पाहून त्यांची भूमिका असायची , गोरगरिबांना मदतीसाठी पुढे यायचे , त्यांच्या काळात भांडणतंटे पोलिस कचेरीत गेली नाहीत, दादांचा दराराच एवढा असायचा किंवा,प्रशासनही हादरायचे… अंबड घनसावंगी तालुक्यातील ठोस कामे दादांनी मार्गी लावली.