Home जळगाव कोवीड हॉस्पिटलच्या मनुष्य बळासह तांत्रिक मशीन ही चुकीचे रिपोर्ट देते

कोवीड हॉस्पिटलच्या मनुष्य बळासह तांत्रिक मशीन ही चुकीचे रिपोर्ट देते

25
0

*कोवीड हॉस्पिटलच्या मनुष्य बळासह तांत्रिक मशीन ही चुकीचे रिपोर्ट देते*
*रक्ताचे प्रमाणात फार मोठा फरक*
*मनियार बियादारीची तक्रार* -चौकशिचे आदेश

जळगाव : एजाज़ शाह
कोविड हॉस्पिटलमध्ये भुसावळ येथील अकील पिंजारी नावाच्या रुग्णाला त्रास होत असल्याने त्याला रेल्वे हॉस्पिटल ने जळगाव हॉस्पिटल ला रेफर केले. रेल्वे हॉस्पिटल ला जाण्यापूर्वी सदर रुग्णाने आपली संपूर्ण तपासणी एक्स-रे, सोनोग्राफी, रक्त तपासणी ही खाजगी लॅब मध्ये केलेली होती. त्यानुसार जळगावी कोविड हॉस्पिटलला ऍडमिट झाल्यावर त्यांची सर्व कागदपत्र पाहणी करून त्यांचे स्वयब घेण्यात आले व त्यांना ऍडमिट केले तीसऱ्या दिवशी संध्याकाळी त्या रुग्णाच्या नातेवाईकाला सांगण्यात आले की तुमच्या रुग्णाचे रक्ताचे प्रमाण अत्यंत कमी झाले असून फक्त दोन टक्के रक्त आहे त्याला आत्ताच चार बॅग रक्ताच्या द्यावे लागतील तुम्ही रक्त दाते घेऊन या आम्ही तोपर्यंत रक्त देतो नातेवाईकांना प्रश्न पडला की ऍडमिट करतांना रक्ताचे प्रमाण तेरा टक्के होते ते या दोन दिवसात दोन टक्के कसे झाले कोणत्याही प्रकारची जखम नाही किंवा रक्तस्राव झालेला नसताना हे कसे काय म्हणून ते विचारात पडले त्यांनी रक्तदात्यांचा जमवाजमव सुरू केली व सदर बाब जळगाव जिल्हा मन्यार बिरादरीचे अध्यक्ष फारुक शेख यांना सांगितले असता त्या रुग्णाचे पुन्हा खासगी ल्याब मधून रक्त तपासणी केली असता ती 13 टक्के आली म्हणून त्या रुग्णाला रक्ताची बॉटल लावलेली असताना बाय फोर्स रक्त देणे बंद केले व त्या रुग्णाला सकाळी तेथून काढून खाजगी रुग्णालयात जळगाव येथे ऍडमिट करण्यात आले तोपर्यंत त्यांचा कोविड अहवाल निगेटिव्ह सुद्धा आलेला होता त्यामुळे जळगावच्या खासगी हॉस्पिटलमध्ये ऍडमिट करतात पुनश्च रक्त तपासणी केली असता त्यांचे रक्त हे 13 टक्के आढळून आले
आज तो रुग्ण खाजगी हॉस्पिटल मधून पूर्णपणे बरा होऊन आपल्या गावी भुसावळ येथे गेला आहे
सदर प्रकरणी आज मनियार बिरादरीचे अध्यक्ष फारुक शेख,ईद गाह ट्रस्टचे अनीस शहा,जामा मस्जिद ट्रस्टचे तय्यब शेख व ईकबॉल सोसयटीचे हारून शेख यांनी प्रशासक डॉक्टर बी एन पाटील ,अप्पर जिल्हाधिकारी गाडीलकर साहेब, अधिष्ठाता डॉ भास्कर खैरे डॉक्टर पोटे यांची भेट घेऊन सदर प्रकार लेखी स्वरुपात निदर्शनास आणला असता त्यांनी सदर प्रकरणी त्वरित डॉक्टर पोटे यांना चौकशी करून अहवाल सादर करा असे आदेश दिले.

*अयाज खान प्रकरणी सुद्धा चौकशीचे आदेश*
सालार नगरमधील आयाज खान हे पूर्णपणे निगेटिव असताना त्यांना कोविड पॉझिटिव्ह कक्षात 18 तास कोणी पाठवले, कोणाच्या आदेशाने पाठवले व का पाठवले? ३ जून ला संध्याकाळी त्यास कोविड हॉस्पिटलमधून डिस्चार्ज देण्यात आले व त्यावर कोविड निगेटिव्ह हे कारण नमूद असल्याने याप्रकरणी सुद्धा चौकशीची मागणी फारुक शेख यांनी केली असता ती सुद्धा मान्य करण्यात आली असून त्या बाबत सुद्धा सविस्तर चौकशीचे आदेश प्रशासक डॉक्टर बी एम पाटील यांनी दिले आहे.
*डॉ अविनाश ढाकने यांचे प्रशासकीय अभिनंदन*

कोविड रुग्णालय येथे माननीय जिल्हाधिकारी डॉक्टर अविनाश ढाकणे यांनी कोविड हॉस्पिटलच्या प्रशासक पदी डॉक्टर बी एन पाटील यांची व त्यांना सहकार्य करण्या साठि अप्पर जिल्हाधिकारी गाडीलकर यांची नेमणूक केल्याने त्या ठिकाणी अत्यंत शिस्तबद्ध पद्धतीने कार्याला सुरुवात झाली म्हणून बिरदारिने जिल्हा अधिकारी डॉ ढाकने यांचे अभिनंदन केले.

Unlimited Reseller Hosting