Home जळगाव तंत्रज्ञान स्वातंत्र्यासाठी शेतकरी संघटनेचे २८ मे ला इमेल आंदोलन

तंत्रज्ञान स्वातंत्र्यासाठी शेतकरी संघटनेचे २८ मे ला इमेल आंदोलन

193

निखिल मोर

पाचोरा – जळगाव भारतात जनुक सुधारित बियाण्यांना परवानगी मिळवी यासाठी शेतकरी संघटनेने केंद्र सरकार व राज्य सरकारमधील संबंधीत मंत्र्यांना इमेल पाठवण्याचे आंदोलन जाहीर केले आहे. २८ मे रोजी स्व.अजित नरदे य‍ांच्या पहिल्या जयंती च्या दिवशी हे आंदोलन करण्यात येणार असल्याची माहिती शेतकरी संघटनेचे अध्यक्ष अनिल घनवट यांनी प्रसिद्धीस दिली आहे.
जगभरामध्ये जनुक सुधारीत (जेनिटिकली मॉडिफाईड) बियाणे वापरले जाते व त्या आधारे कमी उत्पादन खर्चात जास्त उत्पादन अनेक देशात घेतले जात आहे. भारतात मात्र फक्त कापसाच्या बि जी २ या जिएम वाणा नंतर कोणत्याही वाणास किंवा पिकाच्या जिएम बियाण्याला परवानगी देण्यात आलेली नाही.
कपाशीमध्ये तननाशक रोधक बियाणे उपलब्ध आहे व जगभरातील शेतकरी त्याची पेरणी करतात. तननाशक रोधक असल्यामुळे तननाशकाच्या एका फवारणीने तनांचा बंदोबस्त होतो व खुरपणीचा हजारो रुपयाचा खर्च वाचतो. उत्पादनही चांगले येते. भारतात मात्र हे बियाणे वापरण्यास बंदी आहे. आपल्या देशात जिएम पिके घेण्यास बंदी आहे मात्र जिएम सोयाबिन पासुन तयार केलेले तेल सरकार अधिकृतोणे आयात करते हा काय प्रकार आहे?
मागील वर्षी शेतकरी संघटनेने अकोली जहागीर येथे तननाशकरोधक कापुस बियाण्याची जाहीर लागवड करत किसान सत्याग्रह करुन सविनय कायदे भंग केला होता व सरकारला जिएम पिकांना परवानगी देण्याची मागणी केली होती. मात्र सरकारने संघटनेच्या मागणीकडे दुर्लक्ष केले आहे. या वर्षी सुद्धा सरकारचे लक्ष या प्रश्नाकडे वेधण्यासाठी, २८ मे, स्व. अजित नरदे यांच्या जयंतीच्या दिवशी हजारो शेतकरी , पंतप्रधान , केंद्रीय कृषि मंत्री, केंद्रीय पर्यावरण मंत्री, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री, कृषिमंत्री, पर्यावरण मंत्री व गृह मंत्र्यांना इमेल पाठवणार आहेत. ईमेलद्वारे जिएम पिकांना परवानगी देण्याची मागणी करणार आहेत. हजारो शेतकरी वरील मंत्र्यांना इमेल पाठवुन विनंती करणार आहेत. जर आठ दिवसात सरकारने जिएम बियाण्यांना परवानगी दिली नाही तर त्या नंतर “मै भी गुनेहगार” आंदोलन देशभर सुरु करण्यात येइल. या आंदोलनात शेतकरी जाहीरपणे जिएम कापुस, सोयाबीन , मका, वांगी, मोहरी या पिकांच्या लागवडी करतील व प्रशासनाला कळवतील. शेतकरी हा गुन्हा करणार आहे. शेतकरी आपल्या शेतात ” मी जिएम शेतकरी, मै भी गुनेहगार ” असे फलक लावतील.
जिएम पिकांचे बिजोत्पादन, पॅकिंग व विक्री गुजरात , आंध्र प्रदेश व तेलंगणात प्रामुख्याने जास्त होते. तेथे शेतकर्‍यांवर पोलीस कारवाई होत नाही मात्र महाराष्ट्रात धाडी टाकल्या जातात व शेतकर्‍यांवर गुन्हे दाखल केले जात आहेत. सरकारच्या या धोरणाच्या विरोधात शेतकरी संघटनेचे *, मै भी गुनेहगार हे देशव्यापी आंदोलन असेल* या आंदोलनात अनेक राज्यातील शेतकरी जाहीरपणे विविध जिएम पिकांची जाहीर लागवड करतील असे शेतकरी संघटनेचे अध्यक्ष अनिल घनवट यांनी सांगितले.
आंदोलनाची दिशा ठरविण्यासाठी मा.आ. वामनराव चटप, मा. आ. सरोजताई काशिकर, मधुसुदन हरणे, गोविंद जोशी, सतीष दाणी, ललित बहाळे, विजय निवल, गुणवंत पाटील, राम नेवले, सचिन डाफे, विनोद दुबे, आदी नेत्यांनी आॅडिअो कॉन्फरंस द्वारे संवाद साधत निर्णय घेतला असल्याची माहिती अनिल घनवट यांनी प्रसिद्धीत्रकाद्वारे माध्यमांना दिली आहे.तसेच जळगाव जिल्ह्यातील शेतकऱ्यांनीही या आंदोलनाची माहिती घेऊन आंदोलनात सहभागी व्हावे असे आवाहन करण्यात आले आहे. Dagdu शेळके जिल्हा प्रमुख kaduappa पाटील खानदेश विभाग प्रमुख ईश्वर लिधूरे युवा आघाडी प्रमुख मधुकर वेडू पाटील पंडित बाजीराव अतले प्रेम्रज खडके राजू महाजन असोडा नाना पाटील अजय baser abhiman hatkar भडगाव ता प्रमुख समाधान पाटील असे जळगाव जिल्ह्यातील शेतकऱ्यांना आवाहन करण्यात आले आहे जळगाव जिल्हा पश्चिम विभाग प्रमुख यांनी कळविल्याप्रमाणे प्रसिद्धी द्यावी ही नम्र विनंती
२६/०५/२०२०
अनिल घनवट
अध्यक्ष, शेतकरी संघटना.