Home विदर्भ नगरसेवक साकिब शाह यांच्या प्रयत्नाला यश… 2 लाख 20 हजाराचा निधी 500...

नगरसेवक साकिब शाह यांच्या प्रयत्नाला यश… 2 लाख 20 हजाराचा निधी 500 दिव्यांग बांधवांना केला वितरित

127

पुसद :-
गेल्या तीन वर्षापासून अपंग कल्यान निधी चे वाटप नगरपालिका प्रशासनाला च्या वतीने करण्यात आले नव्हते. शहरातील अपंग नागरिक प्रशासनाच्या पायऱ्या झीजवुन वैतागले होते. सोबतच यावर्षीचे कोरोना संकटामध्ये पूर्णपणे होरपळून निघालेला दिव्यांग बांधव उपासमारीच्या सावटाखाली जगत होता या जीवघेण्या आजारामुळे सर्वत्र उपासमारीचे सावटाचि परिस्थिती असल्यामुळे शहरातील अपंग नागरिकांची गैरसोय होत असताना कोणत्याही राजकीय पुढाऱ्यांनी त्यांच्या महत्त्वपूर्ण मागणीकडे लक्ष दिले नाही म्हणून त्यांना आपला हक्काचा दिव्यांग कल्याण निधी आपल्याला मिळेल असे वाटत नव्हते अशावेळी पुसद नगरपालिकेचे नगरसेवक साकिब शाह हे शहरातील दिव्यांग नागरिकांच्या मदतीला धावून आले व त्यांनी पुसद शहरातील दिव्यांग या नागरिकांना तात्काळ त्यांचा हक्काचा निधी वाटप करा अन्यथा लोकशाही मार्गाने आंदोलन करू असा इशारा नगरसेवक साकिब शहा यांनी दिला होता या आंदोलनामध्ये भिम टायगर सेना, बिरसा मुंडा ब्रिगेड, मौलाना आझाद विचार मंच, दिव्यांग सामाजिक संघटना, वंचित बहुजन आघाडी, स्वाभिमानी शेतकरी संघटना, भिम शक्ती संघटना यांच्यामार्फत मागणी न.प. प्रशासनाच्या मुख्याधिकारी निर्मला राशिनकर, अध्यक्ष अनिताताई नाईक, उपाध्यक्ष डॉ अकील मेमन यांना निवेदन दिले होते.
साकिब शहा नेहमी गोरगरिबांच्या समस्या मिटवण्यासाठी तीव्र आंदोलन करतात या धास्तीने त्यांच्या आंदोलनाच्या निवेदनाची दखल घेऊन नगरपालिका प्रशासनाच्या वतीने जवळपास पाचशे दिव्यांग बांधवांना 2 लाख 20 हजाराचा निधी वितरित करण्यात आला. हा दिव्यांग निधी वितरणाच्या वेळी मुख्याधिकारी निर्मलाताई राशिनकर, उपाध्यक्ष डॉ अकील मेमन नगरसेवक साकिब शहा, अपंग नियंत्रण कक्ष प्रमुख अविनाश अर्धापुरकर, लेखाधिकारी संभाजी कोकाटे उपस्थिती होते.
उपासमारीच्या संकट काळात दिव्यांग बांधवांना नगरसेवक साकिब शहा यांनी निधी मिळवून देण्यासाठी केलेली धडपड व मदत ही या काळातील आमच्यासाठी ची लाख मोलाची मदत असल्याची भावना दिव्यांग बांधवांनी व्यक्त केली.