Home जळगाव बांधकाम कामगारांना त्वरित आर्थिक सहाय्य बँकेत जमा करा

बांधकाम कामगारांना त्वरित आर्थिक सहाय्य बँकेत जमा करा

38
0

धडक कामगार रावेर तालुका अध्यक्ष साबीर बेग यांचे तहसीलदार यांना निवेदनाद्वारे मांगणी.

रावेर – शरीफ शेख

रावेर तालुक्यातील नोंदणीकृत बांधकाम कामगारांना आघाडी सरकारने जाहीर केलेले दोन हजार रुपये आर्थिक सहाय्य त्वरित त्यांच्या बँक खात्यात जमा करावे या संदर्भात रावेर तहसीलदार यांना निवेदन देऊन कामगार मंत्री यांना मांगणी केली आहे.एप्रिल महिन्यात राज्यसरकार ने महाराष्ट्रातील सक्रिय नोंदणीकृत बांधकाम कामगारांना दोन हजार रुपये आर्थिक सहाय्य डीबीटी द्वारे थेट त्यांच्या बँक खात्यात जमा होणार असल्याचे जाहीर केले होते तसेच कामगार मंत्री दिलीप वळसे पाटील यांनी देखील एका विडिओ द्वारे याचे माहिती ही दिली होती मात्र ही घोषणेला आज एक महिन्याच्या वर झाल्यावर ही अद्यापही रावेर तालुकतील कामगारांच्या खात्यात आर्थिक सहाय्य जमा झालेले नाही.कोरोनाच्या पार्श्वभूमीवर देशात आज दोन महिन्यांच्या वर काळ लॉकडाऊन ल निघून गेला आहे.या काळात शेकडो बांधकाम कामगार आपल्या घरीच बसले आहे.त्यामुळे त्यांच्या वर उपासमारीची वेळ आली आहे.राज्यसरकार ने एप्रिल महिन्यात केलेली घोषणेचा पालन करून जळगाव जिल्ह्यातील रावेर तालुक्यात नोंदणीकृत बांधकाम कामगारांच्या बँक खात्यात त्वरित जाहीर केलेली रक्कम जमा करावी अशी मांगणी जळगाव जिल्ह्यातील रावेर तालुक्यातील धडक कामगार युनियन चे अध्यक्ष साबीर बेग अन्वर बेग व उपाध्यक्ष हाफिज खान यांनी रावेर तहसीलदार यांच्या कडे निवेदन देऊन कामगार मंत्री यांना मांगणी केली आहे.

Unlimited Reseller Hosting