Home मराठवाडा सर्जा-राजा च्या सजवलेल्या बैलगाडीतून वऱ्हाड निघालं लग्नाला…

सर्जा-राजा च्या सजवलेल्या बैलगाडीतून वऱ्हाड निघालं लग्नाला…

110

लक्ष्मण बिलोरे

जालना – कोरोनामुळे संपूर्ण जग हैराण झाले आहे,अनेकांचे संसार उद्धवस्त झाले आहेत.हे जेवढे खरे आहे तेवढेच कोरोनाने मनुष्य जीवाला बरेच काही शिकविले आहे,हेही मान्य करावेच लागणार आहे.

कोरोनाने धावत्या जगाला ब्रेक दिला. विज्ञान युगात हवेत उठणाऱ्या माणसाला जमिनीवर आणलं, विखुरलेल्या कुटुंबाला एकत्र आणलं…लाखोंची उधळपट्टी करणारा लग्नाचा बार फुसका केला. कोरोनाने समाजाला साधेपणाने जगायला शिकवलं.एरवी आपण ऋण काढून सण साजरा करतो, धुमधडाक्यात लग्नसोहळा पार पाडतो . परंतु कोरोनाने इथेही छडी उगारली..‌.आता हेच बघाना सोमवारी,२५ में रोजीची घटना जालना जिल्ह्यातील धामणगाव (धाड) येथुन १२ किलोमीटरवर असलेल्या रूईखेड मांयबा
येथील उगले आणि फेपाळे परिवाराने देशात कोरोनाचा वाढता प्रभाव लक्षात घेता एकदम साध्या आणि जुन्याकाळी जसे लग्नसोहळे पार पडायचे अगदी त्याच पद्धतीने लाॅकडाउनमधील नियमांचे पालन करत लग्न सोहळा पार पाडला.
या बाबत माहिती अशी की जगन्नाथ उगले यांची कन्या चि. सौ.कां. नेहा आणि दादाराव फेपाळे यांचे चिरंजीव रवींद्र या नव दापांत्यांचा लग्न सोहळा जुन्या काळी जसे बैलगाडी, तांगे,झुल्या,घागरमाळा,गोंडे बांधून सजवलेल्या सर्जा-राजाच्या बैलगाड्या ने वऱ्हाडी आणि वधु वर थाटात लगीनघाई करत त्यावेळचा आनंद काही औरच असतो त्याच पद्धतीने लाॅकडाउनमधील नियमांचे काटेकोर पालन करत विवाह सोहळा उत्साहात संपन्न झाला.