विदर्भ

बँक ऑफ इंडिया वनसडी येथील संजय गांधी निराधार योजनेच्या लाभार्थ्यांना दिलासा मिळणार

बँकेचे शाखा प्रबंधक श्री मंजू हुसेन

कोरपना – मनोज गोरे

कोरपना तालुक्यातील वनसडी येथे बँक ऑफ इंडियाचे शाखा प्रबंधक मंजू हुसेन यांनी संजय गांधी निराधार योजनेच्या लाभार्थ्यांच्या विविध प्रकारच्या समस्या लक्षात घेऊन
कोरपना भागात बँक इंडिया हे एकमेव राष्ट्रीयकृत बँक असून यामध्ये जवळपास अनेक गावातील नागरिक व्यवहार करण्यासाठी येतात त्यामुळे संजय गांधी निराधार योजनेच्या लाभार्थ्यांना रांगेत ताटकळत उभे राहावे लागत आहे तसेच सदर योजनेचे लाभार्थी हे वयोवृध्द अपंग निराधार असून त्यांना याचा शारीरिक त्रास सहन करावा लागत आहे त्यामुळे आपण बँक ऑफ इंडिया वनसडी येथे निराधार योजनेच्या लाभार्थ्यांकरीता स्वतंत्र्य कॉउंटर सुरू करणार असल्याची माहिती बँकेचे शाखा प्रबंधक मंजू हुसेन यांनी प्रतिनिधी बोलताना दिली यामुळे संजय गांधी निराधार योजनेच्या लाभार्थ्यांना दिलासा मिळणार आहे
तसेच कोरपना तालुक्यात संजय गांधी निराधार योजनेचे लाभार्थी मोठ्या प्रमाणात असल्यामुळे त्यांना सुद्धा मोठया प्रमाणात मानसिक त्रास सहन करावा लागत आहे,तसेच लॉकडाऊनच्या काळात खाजगी वाहतुक बंद असल्यामुळे त्यांना पायदळ पायपिट करत वनसडी ला जावे लागत आहे त्यामुळे स्वतंत्र केंद्र सुरू करण्याचा प्रस्ताव विचाराधीन असून सदर केंद्र मंजुरी करिता आपण वरिष्ठांकडे प्रस्ताव दिला असून लॉकडाऊन संपल्यावर सदर प्रस्ताव मंजूर होणार असून सदर प्रस्ताव मंजूर झाल्यावर नारंडा येथे banking correspondence चे केंद्र सुरू करू असे शाखा प्रबंधक मंजू हुसेन यांनी सांगितले,यामुळे नारंडा येथील निराधार लाभार्थ्यांची पायपीट थांबणार असून त्यांना दिलासा मिळणार आहे.

0 Reviews

Write a Review

Advertisements
Advertisements

You may also like

Leave a reply

Your email address will not be published. Required fields are marked *

विदर्भ

सात वर्षाच्या चिमूकलीवर सामूहिक अत्याचार इंझाळा लगतच्या पारधीबेद्यावरील घटना.!

सौ.पदमाताई प्रभाकर मुंजेवार वर्धा , दि. 08 :- देवळी तालुक्यातील इंझाळा गावाच्या जवळ असलेल्या पारधी ...