Home विदर्भ आष्टी शहिद येथे कोविड योध्यांन सोबत साजरी केली ईद

आष्टी शहिद येथे कोविड योध्यांन सोबत साजरी केली ईद

45
0

प्रतिनिधी – रविंद्र साखरे

वर्धा – मुस्लिम धर्मात पवित्र मानल्या जाणाऱ्या रमजान चे सर्व समाज बांधव उपवास ठेवत अल्लाह ला आपल्यावर आशीर्वाद मागतात समाजात सर्वात मोठा मानल्या जाणाऱ्या ईद सणा मध्ये भारतीय जनता युवा मोर्चा चे जिल्हा उपाध्यक्ष व आष्टी शहरातील प्रसिद्ध समाजसेवक आवेज खान यांनी ईद ही शहरातील कोविड योद्धां सोबत साजरी केली.

शहरातील नगरपंचायत मध्ये जाऊन कोविड 19 शी लढणाऱ्या अधिकारी व कर्मचारी तथा ग्रामीण रुग्णालयातील कोविड शी लढणाऱ्या अधिकारी व कर्मचाऱ्यांचा सत्कार केला.व ईद निमित्य त्यांचे मनोबल वाढवले.त्यांना भेटून ईद च्या शुभेच्छा देत या देशातून हा रोग लवकर नाहीसा व्हावा व आपण आधी सारख जीवन जगावं ही प्रार्थना अल्लाह ला केली असल्याचे आवेझ खान यांनी सांगितले.ईद निमित्य आपण आपला परिवार सोडून आमच्या सह ईद साजरी करत असल्याने आनंद होत असल्याचे कोविड योद्धां बोलतांना सांगितले.

आपल्या आगळ्या वेगळ्या समाजकार्याने प्रसिद्ध असलेल्या आवेझ खान यांनी ईद निमित्य कोविड योद्धांचा केलेला हा सन्मानाला शहरातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे या वेळी सर्व कर्मचारी व अधिकारी यांनी आवेझ खान यांचे आभार मानत पुढली ईद व दिवाळी असल्या रोगात जाऊ नये करीत आपण ईशवरला साकडे घालू असे सांगितले.या वेळी आवेझ खान यांच्या सह भाजयुमो आष्टी शहर अध्यक्ष प्रज्वल चोहटकर,उपाध्यक्ष अविनाश कदम रीजवान खान उपस्थित होते.

Unlimited Reseller Hosting