कृषि व बाजार

प्रशासनाने सी.सी,आयचे मनमानी कारभार थांबवुन जलदगतीने शेतकऱ्यांचे संपुर्ण कापुस खरेदि करावे –  वसंत सुगावे पाटील

Advertisements
Advertisements

नांदेड , दि. २२ ( राजेश एन भांगे ) नांदेड जिल्ह्यात सी.सी.आय.मार्फत कापूस खरेदी चालू आहे.पण ही खरेदी अत्यंत संथ गतीने चालू आहे ही खरेदी जलदगतीने करून शेतकऱ्यांचा संपुर्ण कापूस खरेदी करावा अशी मागणी राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेशसरचिटणीस वसंत सुगावे पाटील यांनी निवेदनाद्वारे निवासी उपजिल्हाधिकारी डाॅ. खल्लाळ यांच्याकडे केली.
देशात कोरोणा या महामारिचे संकट असल्यामूळे कापूस खरेदी उशिरा चालू झाली आहे. सी.सी.आय.मार्फत खरेदी करताना या ठिकानी खरेदिदार मनमानी करत कासवगतीने कापूस खरेदी करत आहेत.त्यामुळे 60% शेतकर्यान्कडे कापूस घरातच आहे.यामध्ये पहिल्या वेचनीचा कापूस तेवढा सी.सी.आय. खरेदी करत आहे दुसऱ्या व तिसऱ्या वेचनीचा कापूस सी.सी.आय.खरेदी करत नाहीत.त्यामूळे शेतकरी दुसऱ्या व तिसऱ्या वेचनीचा कापूस खाजगी व्यापार्यांकडे अत्यल्प भावात देत आहेत. भाव कमी असल्यामुळे शेतकरी खाजगी व्यापार्यांना आपला कापुस देण्यास इछूक नाहीत. आता काही दिवसात पेरणीचा हंगाम सुरू होईल त्यामुळे अडचणीत आलेल्या शेतकऱ्यांचा सर्व कापुस सी.सी.आय.मार्फत खरेदी करुन बळीराजाला दिलासा दयावा अन्यथा शेतकरी आत्महत्या करातील त्यामुळे प्रशासनाने यात लक्ष घालुन सी.सी.आय.ची मनमानी व अनागोंदी कारभार थांबवुन शेतकर्याना मदत करावीअशी मागणी राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेशसरचिटणीस वसंत सुगावे पाटील यांनी निवेदनाद्वारे केली यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शहर सरचिटणीस युनूस खान,राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे मुदखेड तालुकाध्यक्ष शिवानंद शिप्परकर , जिल्हा सरचिटणीस चक्रधर कळणे,राष्ट्रवादी युवक काँग्रेस किनवट विधानसभा अध्यक्ष राहूल नाईक,अविनाश पवार आदी उपस्थित होते.

0 Reviews

Write a Review

Advertisements

You may also like

विदर्भ

” सितादही ” पुर्वीच पांढर्या सोन्याला काळा डाग , “आभाळ फाटले”

आयुष्याचा ७\१२कोरा…! कर्जाची चिंता….! भूमिपुत्र हतबल…! मदतीची गरज…! देवानंद जाधव यवतमाळ – सध्या आभाळाच्या सारीपाटावर पावसाचा ...
जळगाव

अमळनेर तालुक्यात सततच्या वादळी पावसाने पिकांचे मोठे नुकसान… मागील वर्षीप्रमाणे यंदाही अतिवृष्टीने तोंडावर आलेला घास जाणार

रजनीकांत पाटील अमळनेर :- यंदा तालुक्यात मोठ्या प्रमाणावर पाऊस झाला असून नदी नाले तलाव तुडुंब ...
कृषि व बाजार

पोखरा प्रकल्पाचीअंमलबजावणी समाधानकारक नसल्यास कारवाई – कृषी मंत्री दादाजी भुसे

सौ.पदमाताई प्रभाकर मुंजेवार लाभार्थ्यांशी फोनद्वारे साधला थेट संवाद कृषी विषयक बाबींचा घेतला आढावा वर्धा दि ...
कृषि व बाजार

शेतकऱ्यांनी उपकर योजनेत कृषि साहित्यासाठी प्रस्ताव सादर करावेत – कृषि व पशुसंवर्धन सभापती बाळासाहेब पाटील रावणगावकर

नांदेड , दि.१६ ( राजेश एन भांगे ) – जिल्हा परिषदेच्या उपकर योजनेंतर्गत अनुदानावर कृषि ...