मराठवाडा

बाईच्या नादी लागला… अन् जीव गमावून बसला…!

Advertisements
Advertisements

लक्ष्मण बिलोरे – घनसावंगी.

जालना – जिल्ह्यातील घनसावंगी तालुक्यातील तीर्थपुरी येथील गवंडी काम करणारा तरूण अंबड तालुक्यातील साडेगाव येथील एका बाईच्या नादी लागला आणि जीव गमावून बसल्याने खळबळ उडाली आहे.

या संदर्भात गोंदी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,तीर्थपुरी येथील शिवाजी विश्वनाथ कासार हा तरूण गवंडी काम करत असे तीर्थपुरी पासून जवळच असलेल्या साडेगाव येथेही तो वर्षभरापासून कामासाठी जात असे या दरम्यान,मयत शिवाजी कासारचे साडेगावातील एका मुलीशी प्रेम संबंध जुळले,नंतर अनैतिक संबंध जुळले .शिवाजी कासार हा विवाहित होता.या दोघांच्या अनैतिक संबंधाला मुलीच्या घरच्यांचा कट्टर विरोध होता.शिवाजी कासार बदल त्यांच्या मनात राग होता.रविवारी,१७ में रोजी शिवाजी कासार हा आकाश कारके, आकाश धोत्रे, सुनिल वाजे हे चौघे तीर्थपुरीतून सचीन वाजे यांचे बांधकाम करण्यासाठी साडेगावला गेले होते.त्या नंतर मयत शिवाजी कासार हा दुपारनंतर एका लग्नाला गेला होता . कामावरून येण्यास उशीर झाल्याने शिवाजी कासारचा भाऊ ब्रीजेशने सोबतच्या लोकांकडे चौकशी केली, शोधाशोध सुरू केली.दरम्यान, शेती रस्त्यावर शिवाजी मृतावस्थेत आढळून आला.त्याच्या अंगावर धारदार शस्त्राने वार केलेले होते.त्याच्यावर पाळत ठेवून असलेले आकाश दगडू कांबळे आणि संदीप ज्ञानदेव कांबळे यांनी शिवाजीला रस्त्यात गाठले आणि त्याची हत्या केली.असा आरोप शिवाजी कासारचा भाऊ ब्रीजेश कासार यांनी केला आहे.ब्रीजेश कासारच्या फिर्यादीवरून आरोपींविरुद्ध गोंदी पोलिस ठाण्यात खूनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.गोंदी पोलिस ठाण्यात नव्यानेच पदभार स्विकारलेले सहायक पोलिस निरीक्षक रत्नदीप जोगदंड , गोपनीय शाखेचे महेश तोटे,पोहेकाॅ खडेकर,चव्हाण, अविनाश पगारे,मदन गायकवाड, योगेश दाभाडे, यांनी जिल्हा पोलिस अधीक्षक एस.चैतन्य यांच्या मार्गदर्शनाखाली तपासचक्र वेगाने फिरवत अवघ्या तासाभरात आरोपींना जेरबंद केले आहे.

0 Reviews

Write a Review

Advertisements

You may also like

मराठवाडा

जालन्यात खा.रावसाहेब दानवे यांच्या निवासस्थानी शेतकरी संघटनेचे राखरांगोळी आंदोलन

जालना -‌ लक्ष्मण बिलोरे कांद्यावरील निर्यातबंदी कायमस्वरूपी उठविण्यासाठी लोकसभेत शेतकऱ्यांना न्याय मिळवून द्यावा अशी मागणी ...
मराठवाडा

पुरग्रस्तांच्या अन्नधान्य आणि निवाऱ्याची पुर्व व्यवस्था प्रशासन कधी करणार..???

गोदामायने केले रौद्ररूप धारण,२००६ची पुनरावृत्ती होण्याची शक्यता…! घनसावंगी – लक्ष्मण बिलोरे पैठण – येथील जायकवाडी ...
मराठवाडा

….हा तर राज्य सरकारने मराठा समाजाच्या जखमेवर मीठ चोळण्याचा प्रकार आहे.

पोलिस मेगाभरती घोषणेच्या पार्श्वभुमीवर मराठा समाजातील तरूणांच्या संतप्त प्रतिक्रिया…!   घनसावंगी – लक्ष्मण बिलोरे कुंभार ...