Home विदर्भ मांडगाव येथील गावात प्रवेश करणारे सगळे रस्ते बंद आपत्ती व्यवस्थापन समितीचा निर्णय.!

मांडगाव येथील गावात प्रवेश करणारे सगळे रस्ते बंद आपत्ती व्यवस्थापन समितीचा निर्णय.!

125

सौ.पदमाताई प्रभाकर मुंजेवार

वर्धा – कॊरोना व्हायरस च्या पार्श्वभूमीवर शासन स्तरावर अनेक निर्णय घेतले जात असताना मांडगाव येथील आपत्ती व्यवस्थापन समिती ने गावातील सर्व रस्ते बंद करून 1 मुख्य रस्ता सुरू ठेऊन त्यावरही चौकशी कक्ष निर्माण करण्यात आला असून प्रत्येक व्यक्तीची कसून चौकशी केल्या जात आहे त्याचप्रमाणे कुणी कॊरोना बाधित प्रदेशातुन तर आला नाही न,त्याचप्रमाणे जिह्याबाहेरील कुणी विना परवानगी गावात प्रवेष तर करत नाही याकडे लक्ष दिले जात आहे.


ठिकठिकाणी फलक लावण्यात आले असून लाऊडस्पीकर द्वारे सर्व ग्रामस्थांना सूचना दिल्या जात असून योग्य ती खबरदारी घ्यायला सांगितले आहे
आज तिसऱ्यांदा परत ग्रामपंचायत कडून निर्जंतुककरणं फवारणी करण्यात आली असून गर्दी चे ठिकाण ,बाजार ,दवाखाना बँक ,इ 2 दिवसातून एकदा फवारणी केल्या जात आहे,
रस्त्यावर विनाकारण फिरणाऱ्या नागरिकांवर तसेच विनापरवाना दुकान उघडण्यात आल्यावर दंड देऊन कारवाई करण्यात येत आहे सर्व बाहेरून आलेल्या लोकांना विलगीकारण मध्ये ठेवण्यात येत असून त्यांच्यावर आपत्ती व्यवस्थापन समिती लक्ष ठेऊन आहे. या सर्व उपाययोजना आपत्ती व्यवस्थापन समिती चे अध्यक्ष सरपंच सौ संध्या ताई डांगरी तसेच पोलीस पाटील तडस ,मुनेश्वर साहेब ग्राम विकास अधिकारी ,व संपूर्ण सदस्य यांच्या प्रयत्नातून करण्यात येत आहे
आपल्या गावात कॊरोना चा प्रादुर्भाव न व्हावा यासाठी आपत्ती व्यवस्थापन समिती प्रयत्न करीत आहे.