Home विदर्भ देवळी तालुक्यातील नांदोर्यातील वार्ड बाय सह 47 लोक क्वारंणटाईम

देवळी तालुक्यातील नांदोर्यातील वार्ड बाय सह 47 लोक क्वारंणटाईम

109

सौ.पदमाताई प्रभाकर मुंजेवार

वर्धा – जिल्ह्यातील हिवरा तांडा येथील करोनानं मृत पावलेली महिला अनेक व्यक्तीच्या संपर्कात आल्याचे स्पष्ट झाल्याने या सर्व लोकांची माहिती घेण्यासाठी प्रशासनाने सुरूवात केली आहे.

तालुक्यातील नांदोरा डफरे येथील वार्ड बाय या महिलेच्या संपर्कात आल्याने जिल्हा आरोग्य अधिकारी डाॅ.अजय डवले यांच्या मार्गदर्शनाखाली तालुका आरोग्य अधिकारी डाॅक्टर प्रविण धमाणे यांच्या चमुने नादोंरा येथे जावून वार्ड बाय कोणाकोणाच्या संपर्कात आला त्यांची माहीती घेतली असता तो 14 लोकांच्या संपर्कात आल्याचे स्पष्ट झाले.
हे चौदा लोक इतरांच्या संपर्कात आल्याने हा आकडा 47 लोकांचा झाला आहे.
वार्ड बाय व त्याचा भावू यांना आरोग्य विभागाने सावंगी येथे विलगीकरण कक्षात पाठवीले असून त्यांचे स्ञाव नमुने घेतले असून पुढील तपासणी करीता पाठविण्यात आले.
इतर गावातील लोकांना प्राथमीक शाळेच्या इमारतीमधे क्वारंणटाईम करीता ठेवले आहे. यामुळे देवळी परिसरात भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. या वर आरोग्य विभाग बारीक लक्ष ठेवून आहे.
या टीम मध्ये सामुदायीक आरोग्य अधिकारी डाॅ.स्वाती बडगे वैद्यकीय अधिकारी डाॅ. ॠतुजा साखरकर , आरोग्य सहाय्यक प्रमोद घुडे, महसुल विभाग , पोलीस कर्मचारी सह आशा व अंगणवाडी कर्मचारी सामील झाले होते.