जळगाव

ईद साठी खरेदी करणार नाही-घराच्या बाहेर पडणारच नाही मुस्लीम समुदायाचा निर्णय

Advertisements
Advertisements

जळगाव:एजाज़ शाह
दी.९मे
संपूर्ण महाराष्ट्रात व जळगाव जिल्ह्यात कोरणा ने घेतलेल्या उग्र स्वरूपाची दखल घेत शासनाला व मानव जातीला सहकार्य करण्यासाठी जळगाव शहरातील मुस्लिम समाजातील आलिम, उलमा, मौलाना, मुफ़्ती व सामाजिक कार्यकर्ते यांनी संयुक्तरित्या हा निर्णय घेतला की येणारी रमजान ईद आम्ही सर्वसाधारण पद्धतीने साजरी करू व या ईदला कोणत्याही प्रकारचे कपडे अथवा इतर प्रकारचे वस्तू खरेदी करणार नाही. खरेदीसाठी घराबाहेर पडणार नाही एवढेच नव्हे तर खरेदीचे जे पैसे वाचतील त्या पैशातून आम्ही आमच्या शहरातील हिंदू-मुस्लीम समाजातील गरीब बांधवांना आर्थिक सहकार्य करु अथवा धान्य रेशन किट वाटप करूया असा एकमुखी निर्णय घेण्यात आला.

*बैठक व त्यातील सूचना*

काँग्रेस पक्षाचे जमील शेख यांनी फारूक शेख यांच्या घरी एका बैठकीचे आयोजन केले होते या बैठकीत उपस्थितांनी मास्क लावून व शारीरिक अंतर ठेवून आपली उपस्थिती दर्शवली होती.
सदर बैठक जळगाव शहराचे काज़ी मुफ़्ती अतीकुर्रहमान यांच्या अध्यक्षतेखाली झाली.
रज़ा मस्जिद चे मौलाना हामिद यांनी कुरान पठन करून सुरवात केली.
सर्व प्रथम निमंत्रक जमील शेख यांनी बैठकीचे उद्देश विदित केले व उपस्थितांनी यात आपापले मत व सूचना द्यावा असे ठरले त्याप्रमाणे मौलाना अश्फाक( बिलाल मस्जिद) मौलाना मुख्तार नदवी(शाहु नगर मस्जिद) मौलाना जाहिद( जुना मेहरून जामा मस्जिद), सुन्नी मस्जिद चे ट्रस्ट शरीफ शाह,शिवाजी नगर चे आसिफ शेख,रिज़वान जागीरदार, कादरिया फॉउंडेशन चे फारुक कादरी, रजा मस्जिद चे विश्वस्त इक्बाल वजिर, अमन फॉउंडेशन चे शाहिद सय्यद ,मौलाना रेहान(मरकज-जळगाव मस्जिद) डॉक्टर रिजवान खाटीक, जामा मस्जिद चे ट्रस्ट तय्यब शेख, ईदगाह चे अनिस शाह, अक़्सा मस्जिद चे मौलाना सालिक सलमान , सामाजिक कार्य कर्ते इसाक बागवान, एमस् चे उमर शेख , मनियार बिरदारीचे फारुक शेख आदींनी आपले विचार व सूचना मांडल्या.त्या संकलित करून त्यास ठरावाचे स्वरूप देण्यात आले

*५ ठराव सर्व सम्मतिने पारित*

१)रमजान ईद साधेपणाने साजरी करण्यात येईल
२) ईद साठी कोणीही ही नवीन कपड़े व इतर वस्तु खरेदी करणार नाही
३) कोणीही घराबाहेर जाणार नाही, विशेष महिला बिल्कुल मार्केट मधे जाणार नाही सर्व घरातच थाम्बतील
४) खरीदारी चे जे पैसे वाचतील त्या पैशाच्या माध्यमातून हिंदू-मुस्लीम गोरगरिबांना रेशन किट च्या स्वरुपात अथवा रोख पद्धतीने मदत करण्यात येईल

५)सदरचे ठराव पॉम्प्लेट च्या मध्यमाने व मशिदीच्या माइक मार्फत प्रसारित करण्यात येईल.

असे पाच ठराव फारुक शेख यांनी सादर केले असता त्यास उपस्थितांनी अनुमोदन दिले व ते मंजूर करण्यात आले.

*बैठकीत यांची होती उपस्थिति व पठिम्बा*

सय्यद इस्माईल इब्राहीम, मोहम्मद फारुख,इब्राहिम इस्माईल खान, गुलजार खान, हाफिज रहमान, अक्रम खान, युसुफ शेख, जाकिर अहमद देशमुख, इरफान मलिक, निजामुद्दीन शेख तसेच दूरध्वनीद्वारे गफ्फार मलिक, करीम सालार,सैयद चांद, डॉक्टर अमानुल्ला शहा, मुफ़्ती हारून,
प्रो डॉ इकबाल शाह, फिरोज मुलतानी, प्रोफेसर डॉक्टर एम इक्बाल, ॲडव्होकेट अमीर शेख, एडवोकेट इस्माईल पटेल, एडवोकेट इमरान, एडवोकेट तन्वीर, डॉक्टर जावेद खान, डॉक्टर एजाज शाह, जाहिद इंजीनिअर, इंजी अल्तमश खान,आरिफ देशमुख, अनवर सिकलीगर,अफजल पठान,अफजल जनाब,शाकिर चित्तलवार,डॉ शाहिद यांनी सुद्धा वरील ठरवास पाठिंबा दर्शविलेला आहे

0 Reviews

Write a Review

Advertisements

You may also like

जळगाव

ऑल इंडिया आदिवासी एम्प्लॉईज फेडरेशन च्या महिला जिल्हाउपाध्यक्ष पदी प्रा जयश्री दाभाडे साळुंके यांची निवड…

रावेर (शरीफ शेख)  ऑल इंडिया आदिवासी एम्प्लॉईज फेडरेशन केंद्रिय कार्यालय प्लॉट नं.३५. गोंडवाना नगर क्र.०२, ...
जळगाव

अमळनेर तालुक्यात सततच्या वादळी पावसाने पिकांचे मोठे नुकसान… मागील वर्षीप्रमाणे यंदाही अतिवृष्टीने तोंडावर आलेला घास जाणार

रजनीकांत पाटील अमळनेर :- यंदा तालुक्यात मोठ्या प्रमाणावर पाऊस झाला असून नदी नाले तलाव तुडुंब ...
जळगाव

नरेंद्र मोदी जीं च्या वाढदिवसानिमित्त मनियार बिरादरी तर्फे १८ मागण्याचे निवेदन

रावेर (शरीफ शेख)   माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी जी यांच्या ७० व्या वाढदिवसानिमित्त जळगाव जिल्हा मन्यार ...
जळगाव

अल्पसंख्यांक सेवा संघटने च्या जिल्हाध्यक्ष पदी सलीम इनामदार यांची निवड

रावेर (शरीफ शेख)  अल्पसंख्यांक सेवा संघटने ची प्रदेश कार्यालय शिवाजीनगर येथे प्रदेशाधयक्ष जहाँगीर ए खान ...