Home रायगड माजी उपनगराध्यक्ष लालधारी पाल यांचा गोरगरीबांना मदतीचा हात…!

माजी उपनगराध्यक्ष लालधारी पाल यांचा गोरगरीबांना मदतीचा हात…!

53
0

कर्जत – जयेश जाधव

कर्जत – नगरपरिषदेचे माजी उपनगराध्यक्ष श्री.लालधरी शेठ पाल यांनी गुंडगे गावात घरोघरी जाउन गरजू, गोरगरीब लोकांना कोरडा शिधा वाटप केला.कोणताही गाजावाजा न करता,कोणतीही प्रसिध्दी न करता,लोकांच्या दारात जावुन सन्मानाने गरजूंना मदत केली आहे.आता पर्यंत एकंदरीत संपुर्ण गुंड़गे गाव,जुने एस टि स्टँड व परिसरात टप्प्या टप्प्याने सुमारे 400 लोकाना कोरडा शिधा वाटप केला आहे.
प्रत्येक वेळेस मदत करणार म्हणून लालधरी पाल यांची ओळख आहे.मग अशा संकट समयी ते मागे कसे राहतील.यावेळी अजय पाल यांचे हस्ते सर्व वाटप करण्यात आले.सोबत माजी नगरसेवकदिपक मोरे,सुनिल परदेशी,आनंद घोड़के,विकास भालेराव(जैक),साहिल,मनिष मोरे इत्यादी होते. तरी लालधरी शेठ पाल व अजय पाल यांचे तेथील परिसरातील नागरिकांनी आभार मानले.

Unlimited Reseller Hosting