Home जळगाव भुसावळ विभागातून ४२ वॅगन कांद्याची बांग्लादेशात निर्यात

भुसावळ विभागातून ४२ वॅगन कांद्याची बांग्लादेशात निर्यात

137

लियाकत शाह

भुसावळ – भुसावळ विभागातून या पूर्वी कधीही बांग्ला देशात कधीही निर्यात न झालेला कांदा प्रथमच ४२ वॅगनद्वारे निर्यात करण्यात आला आहे. लासलगाव, निफाड, खैरवाडी हा परीसर कांदा उत्पादक असून या भागातून प्रथमच बांग्लादेशात कांद्याची निर्यात झाली आहे. बुधवारी सायंकाळी लासलगाव येथून ४२ रॅक असलेली पहिली मालगाडी बांग्ला देशातील दरशना या रेल्वे स्थानकाकडे रवाना झाल्याचे सूत्रांनी सांगितले. लासलगाव, निफाड, खैरवाडी या स्थानकावरून कांदा भरून ४२ वॅगनची पहिली गाडी बुधवारी रवाना झाली असतानाच गुरूवारी सायंकाळी पुन्हा दोन रॅक बांग्लादेशात रवाना झाल्याचे सांगण्यात आले.